‘भाभी जी घर पर है’ मालिकेतील अभिनेत्याच्या मुलाचं निधन
19 वर्षीय मुलाच्या निधनाने कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
मुंबई- टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘भाभी जी घर पर है’ (Bhabhi Ji Ghar Par Hai) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते जीतू गुप्ता (Jeetu Gupta) यांच्या मुलाचं निधन झालंय. जीतू यांच्या मुलाचं नाव आयुष होतं. तो 19 वर्षांचा होता. आपल्या मुलाच्या निधनाने जीतू यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जीतू यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर आपल्या मुलाचा फोटो पोस्ट करत त्याच्या निधनाची माहिती दिली. हीच पोस्ट कॉमेडियन सुनील पाल यांनीसुद्धा शेअर केली आहे.
आयुषचा फोटो शेअर करत सुनील पाल यांनी लिहिलं, ‘त्याच्या आत्म्याला शांती लाभो. भाभी जी घर पर है या मालिकेतील अभिनेते, माझा भाऊ जीतू यांचा मुलगा आयुष (19 वर्षे) आता आपल्यात नाही.’
View this post on Instagram
जीतूने एक दिवस आधी रुग्णालयातील मुलाचा पोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये आयुष रुग्णालयातील बेडवर होता. त्याची प्रकृती गंभीर आहे आणि तो कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाही, असं जीतून यांनी लिहिलं होतं.
‘मुलगा आयुषबद्दलची पोस्ट वाचल्यानंतर मला अनेकांनी कॉल्स आणि मेसेज केले. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा. त्याची प्रकृती गंभीर आहे. मी सध्या कोणाशीच बोलण्याच्या मनस्थितीत नाही’, असंही त्यांनी लिहिलं होतं.
जीतूने भाभी जी घर पर है या मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारली आहे. या मालिकेमुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. ‘ही मालिका माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट आहे,’ असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.