ACP Pradyuman : काय सांगता…? CID मालिकेतील एसीपी प्रद्युम्न कामाच्या शोधात, वाचा नेमकं काय घडलं?
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी टिव्ही मालिका म्हणजे CID. एक काळ होता, त्यावेळी लहान मुलांना विचारले की, तुला मोठे होऊन काय व्हायचे आहे? तर लहान मुले म्हणायचे CID आॅफिसर आणि त्यामध्ये एसीपी प्रद्युम्न व्हायचे आहे. एक काळ CID मालिकेने प्रचंड गाजवला आहे.
मुंबई : लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी टिव्ही मालिका म्हणजे CID. एक काळ होता, त्यावेळी लहान मुलांना विचारले की, तुला मोठे होऊन काय व्हायचे आहे? तर लहान मुले म्हणायचे CID आॅफिसर आणि त्यामध्ये एसीपी प्रद्युम्न व्हायचे आहे. एक काळ CID मालिकेने प्रचंड गाजवला आहे. एसीपी प्रद्युम्न (ACP Pradyuman) यांची भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे शिवाजी साटम (Shivaji satam) यांनी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
एसीपी प्रद्युम्न कामाच्या शोधामध्ये
विशेष म्हणजे शिवाजी साटम यांनी जवळपास CID मालिकेमध्ये 20 वर्ष काम केले आहे. कदाचित खूप कमी लोक असतील ज्यांना एसीपी प्रद्युम्न यांचे खरे नाव माहीती आहे. लोक त्यांना आजही एसीपी प्रद्युम्न याच नावाने ओखळतात. मात्र, एसीपी प्रद्युम्न यांना आता काहीतरी नवीन करायचे आहे. प्रद्युम्न यांनी स्वत: एका मुलाखतीत एक खंत व्यक्त केली आहे. एचटीच्या म्हणण्यानुसार, शिवाजी साटम यांना फक्त एकच ऑफर आली होती. जी त्यांना आवडली नाही.
एसीपी प्रद्युम्न काम नसल्यामुळे अस्वस्थ
शिवाजी साटम म्हणतात की, मी मराठी रंगभूमीतून आलो आहे. आतापर्यंत मी नेहमी मला आवडते तेच काम केले आहे. त्यांनी शेवटी तापसी पन्नू स्टारर चित्रपट ‘हसीन दिलरुबा’मध्ये काम केले आहे. मात्र, या चित्रपटामध्ये त्यांची भूमिका खूपच छोटी होती. शिवाजी यांनी सांगितले की, मी 20 वर्षांपासून एसीपी प्रद्युम्न यांच्या भूमिकेमध्ये काम करत होतो. पण मला आता काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याची इच्छा आहे. मात्र, म्हणावे तसे काम मिळत नाहीये. मात्र, CID हा शो परत सुरू झाला तर मला नक्कीच एसीपी प्रद्युम्नच्या भूमिकेमध्ये परत एकदा काम करायला आवडेल. पण कोरोनापासून काम नसल्यामुळे रिकामे बसल्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे.
संबंधित बातम्या :
‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्यावर काळाचा घाला, पुण्यातील घाटात कार अपघातात मृत्यू