Vishhal Nikam: “लोकांना वाटेल मी खोटं बोलतोय, पण..”; विशाल निकमचं सौंदर्याशी ब्रेकअप

ज्या सौंदर्याचा उल्लेख तो बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात करायचा, आता मात्र तिच्याशी काहीच संपर्क नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. मी सौंदर्याशी कमिटेड असून आमच्या लग्नातही तुम्हाला बोलावेन, असंही तो बिग बॉसच्या घरात म्हणाला होता. मात्र बिग बॉसनंतर या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

Vishhal Nikam: लोकांना वाटेल मी खोटं बोलतोय, पण..; विशाल निकमचं सौंदर्याशी ब्रेकअप
Vishhal NikamImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 1:42 PM

‘बिग बॉस मराठी 3’चा (Bigg Boss Marathi 3) विजेता विशाल निकम (Vishhal Nikam) याने बिग बॉसच्या घरातच त्याच्या गर्लफ्रेंडविषयी खुलासा केला होता. सौंदर्या (Saundarya) हे नाव घेत त्याने अनेकदा त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. मात्र ही सौंदर्या नेमकी कोण आहे, हे कोणालाच कधी कळू शकलं नाही. विशालच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावरही शोधण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी त्याचं नाव त्याच्या सहकलाकारांशी जोडलं. ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेतील अक्षया हिंदळकर हीच विशालची सौंदर्या असल्याची मध्यंतरी चर्चा होती. मात्र विशालने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना अशा अफवा पसरवू नका, अशी विनंती केली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विशालने सौंदर्याशी ब्रेकअप झाल्याचं सांगितलं. ज्या सौंदर्याचा उल्लेख तो बिग बॉसच्या घरात करायचा, आता मात्र तिच्याशी काहीच संपर्क नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. मी सौंदर्याशी कमिटेड असून आमच्या लग्नातही तुम्हाला बोलावेन, असंही तो बिग बॉसच्या घरात म्हणाला होता. मात्र बिग बॉसनंतर या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

ई टाइम्सच्या दिलेल्या मुलाखतीत विशालने सौंदर्याशी ब्रेकअप झाल्याचं सांगितलं. “सौंदर्याशी माझं ब्रेकअप झालंय. सौंदर्याशी असलेल्या रिलेशनशिपवरून मी खोटं बोलतोय असं लोकांना वाटत असेल पण हे खरंय. सौंदर्या माझी गर्लफ्रेंड होती पण आता मी सिंगल आहे आणि माझ्यावर कामावर लक्ष केंद्रीत करतोय. बिग बॉस मराठीनंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. मी जिथेही जायचो, तिथे मला लोक सौंदर्याबद्दल विचारायचे. म्हणूनच मी ब्रेकअपबद्दल सांगायचं ठरवलंय. माझ्यासाठी हे फार कठीण आहे. मला माहितीये, लोक कदाचित माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि त्यांना वाटेल मी खोटं बोलतोय. पण मी खोटं बोलत नाहीये. मूव्ह ऑन होणं खूप कठीण आहे पण मी प्रयत्न करतोय.”

हे सुद्धा वाचा

इन्स्टा फोटो-

सौंदर्याबद्दल विशालने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. ‘योग्य वेळ आल्यावर, काही खासगी गोष्टी सुरळीत झाल्यावर स्वत:हून सौंदर्याचं नाव सांगेन. ती एक सामान्य मुलगी असून अभिनयसृष्टीशी तिचा काही संबंध नाही. त्यामुळे इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीसोबत माझं नाव कृपया जोडू नका’, असं त्याने म्हटलं होतं. विशाल सध्या ‘आई मायेचं कवच’ या मालिकेत मानसिंगची भूमिका साकारतोय.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.