AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kapil Sharma: कपिल शर्माविरुद्ध गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

"आम्ही कोर्टात जाण्याआधी त्याच्याशी संपर्क साधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, मात्र त्याने काहीच उत्तर दिलं नाही', असंही ते म्हणाले. हे प्रकरण न्यूयॉर्कच्या न्यायालयात प्रलंबित असून कपिलविरोधात कायदेशीर कारवाई करण्यावर साई यूएसए इंक ठाम आहे.

Kapil Sharma: कपिल शर्माविरुद्ध गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?
Kapil SharmaImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jul 03, 2022 | 3:24 PM
Share

कॉमेडियन कपिल शर्माविरुद्ध (Kapil Sharma) उत्तर अमेरिका दौऱ्यासाठी केलेल्या कराराचा भंग (Breach Of Contract) केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2015 मध्ये कपिलने हा करार केला होता. Sai USA Inc कडून हा खटला दाखल करण्यात आला आहे. कपिलला सहा शोसाठी पैसे देण्यात आले होते परंतु त्याने त्यापैकी फक्त पाचच कार्यक्रम केले असा आरोप आहे. कपिलने नुकसान भरपाई देणार असल्याचं म्हटलं होतं. न्यूजर्सीमधील साई यूएसए इंकचं नेतृत्व अमित जेटली करत आहेत. त्यांच्या फेसबुक पेजवर साई यूएसएने या प्रकरणाचा अहवाल शेअर केला आहे. “2015 मध्ये कराराचा भंग केल्याबद्दल SAI USA INC ने कपिल शर्माविरुद्ध खटला दाखल केला आहे”, असं कॅप्शन त्या पोस्टला देण्यात आलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अमित यांनी सांगितलं की कपिलने नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं. “आम्ही कोर्टात जाण्याआधी त्याच्याशी संपर्क साधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, मात्र त्याने काहीच उत्तर दिलं नाही’, असंही ते म्हणाले. हे प्रकरण न्यूयॉर्कच्या न्यायालयात प्रलंबित असून कपिलविरोधात कायदेशीर कारवाई करण्यावर साई यूएसए इंक ठाम आहे.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

सध्या कपिल त्याच्या टीमसोबत कॉमेडी शोसाठी उत्तर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. आतापर्यंत कपिलने सुमोना चक्रवर्ती, राजीव ठाकूर, किकू शारदा, चंदन प्रभाकर आणि कृष्णा अभिषेक यांच्यासह व्हॅनकॉव्हर आणि टोरंटोमध्ये परफॉर्म केले आहेत. कपिल त्याच्या इंस्टाग्रामवर या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. हा दौरा सुरू करण्याआधी त्याने टीव्हीवरील शो संपवला होता. त्याच्या शोचा शेवटचा भाग 5 जून रोजी प्रसारित झाला होता. आता उत्तर अमेरिकेतून परतल्यावर शोच्या पुढील सिझनची घोषणा केली जाईल.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.