Karanvir Bohra: करणवीर बोहरासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल; महिलेनं पैसे परत मागितल्यावर दिली जीवे मारण्याची धमकी
काही दिवसांपूर्वीच करणवीर बोहरा हा कंगना रनौतच्या लॉक अप या रिॲलिटी शोमध्ये दिसला होता. या शोमध्ये त्याने आपल्यावर खूप कर्ज असून अनेक खटलेसुद्धा सुरू असल्याचा खुलासा केला होता.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकारांपैकी (TV Actor) एक असलेल्या करणवीर बोहरासह (Karanvir Bohra) सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा (cheating case) दाखल करण्यात आला आहे. करणवीर बोहराने एका 40 वर्षीय महिलेची पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी त्याने त्या महिलेला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचा आरोप आहे. ओशिवरा पोलिसांनी करणवीरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितलं की, मनोज बोहरा उर्फ करणवीर बोहरा याने तिच्याकडून 1.99 कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते. 2.5 टक्के व्याजासह ते पैसे परत करण्याचं आश्वासन त्याने दिलं होतं. परंतु आतापर्यंत केवळ 1 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.
महिलेचा आरोप आहे की जेव्हा तिने तिचे पैसे परत मागितले तेव्हा करणवीर आणि त्यांची पत्नी तजिंदर सिद्धू यांनी नीट उत्तर दिलं नाही. इतकंच नव्हे तर त्यांनी महिलेला गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी करणवीर बोहरा आणि इतरांविरुद्ध तपास सुरू केला आहे. लवकरच त्यांचे जबाब नोंदवले जातील.
ट्विट-
Maharashtra | Case registered against 6 people including actor Manoj Bohra alias Karanvir Bohra for allegedly cheating a 40-year-old woman of Rs 1.99 crores after promising to return it at 2.5% interest; woman claimed that only an amount of over Rs 1cr was returned: Oshiwara PS
— ANI (@ANI) June 15, 2022
The woman also claimed that when she asked for the amount, Bohra & his wife Tajinder Sidhu did not respond properly & threatened to shoot her. Police have started an investigation & will soon record their statements: Oshiwara Police Station
— ANI (@ANI) June 15, 2022
काही दिवसांपूर्वीच करणवीर बोहरा हा कंगना रनौतच्या लॉक अप या रिॲलिटी शोमध्ये दिसला होता. या शोमध्ये त्याने आपल्यावर खूप कर्ज असून अनेक खटलेसुद्धा सुरू असल्याचा खुलासा केला होता. करणवीरने रडत रडत सांगितलं होतं की, पैसे परत करू न शकल्यामुळे त्याच्याविरोधात अनेक केसेस सुरू आहेत. त्याच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने आत्महत्या केली असती. “मी कर्जबाजारी झालो आहे. मी पैसे परत न केल्याने माझ्यावर 3-4 केसेस सुरू आहेत. 2015 पासून मी जे काही काम केलं आहे किंवा करत आहे, मी ते फक्त यासाठी करत आहे की मी त्याचे पैसे परत करू शकेन. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने आत्महत्या केली असती,” असं तो म्हणाला होता.
करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी-
View this post on Instagram
करणवीर बोहराने 1990 मध्ये ‘तेजा’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने आणखी काही चित्रपटात काम केलं. ‘दिल से दी दुआ: सौभाग्यवती भव:’, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘कसौटी जिंदगी के’, ‘कुसुम’, ‘क्या बादशाह क्या हकीकत’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आणि काही रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला.