Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Debina Bonnerjee: “मग गर्भपात करावा का?”, प्रसूतीच्या 4 महिन्यांनंतर दुसऱ्यांदा गरोदर राहिलेल्या डेबिनाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

डेबिनाने चार महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिल 2022 मध्ये पहिल्या मुलीला जन्म दिला. पहिल्या मुलीच्या प्रसूतीनंतर चार महिन्यांनी तिने दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं.

Debina Bonnerjee: मग गर्भपात करावा का?, प्रसूतीच्या 4 महिन्यांनंतर दुसऱ्यांदा गरोदर राहिलेल्या डेबिनाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
Debina Bonnerjee: अभिनेत्री डेबिना दुसऱ्यांदा गरोदरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 2:05 PM

अभिनेत्री डेबिना बॅनर्जीने (Debina Bonnerjee) काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा गरोदर (Pregnancy) असल्याचं जाहीर केलं. मात्र डेबिनाच्या चाहत्यांसाठी ही बातमी थोडी चकित करणारी होती. याचं कारण म्हणजे डेबिनाने चार महिन्यांपूर्वी म्हणजेच एप्रिल 2022 मध्ये पहिल्या मुलीला जन्म दिला. पहिल्या मुलीच्या प्रसूतीनंतर चार महिन्यांनी तिने दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं. सोशल मीडियावर यावरून विविध प्रतिक्रिया येत असतानाच अनेकांनी डेबिनाला ट्रोलदेखील केलं. काहींनी गुरमीत-डेबिनाला (Gurmeet Choudhary) शुभेच्छा दिल्या. तर काहींनी या दोघांच्या दुसऱ्या अपत्याच्या प्लॅनिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता डेबिनाने तिला ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

डेबिनाने नुकताच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यामध्ये अनेक युजर्सनी तिला तिच्या दुसऱ्या गर्भधारणेबद्दल प्रश्न विचारलं होतं. एका युजरने डेबिनाला विचारलं की, दुसऱ्यांदा गर्भधारणेपूर्वी तुम्ही लियानाला थोडा वेळ दिला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? यावर डेबिना म्हणाली, “मी पण तुम्हाला एक प्रश्न विचारते. जेव्हा काहींना जुळी मुलं होतात, तेव्हा ते काय करतात?”

हे सुद्धा वाचा

त्याचवेळी दुसरा युजर म्हणाला की, “मॅडम, तुम्हाला पहिल्या प्रेग्नंसीमध्ये खूप त्रास झाला होता. दुसऱ्या गर्भधारणेसाठी एक वर्ष वाट पाहावी असं तुम्हाला वाटलं नाही का? त्या युजरला उत्तर देताना डेबिना म्हणाली, “अशा परिस्थितीला मी चमत्कार म्हणते. तुमचं काय म्हणणं आहे यावर? गर्भपात?”

इन्स्टाग्रामवर डेबिनाने गुरमीत, लियानासोबत हातात सोनाग्राफीचा फोटो दाखवत चाहत्यांना दुसऱ्यांदा गरोदर असल्याची गुड न्यूज दिली होती. ‘काही निर्णयांची वेळ ही ठरलेली असते आणि त्याला कोणीच बदलू शकत नाही. हासुद्धा असाच एक आशीर्वाद आहे. आमच्या कुटुंबात आणखी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे’, अशी पोस्ट तिने लिहिली होती. डेबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. गुरमीत आणि डेबिनाने ‘रामायण’ या मालिकेत एकत्र काम करून लोकप्रियता मिळवली. 2008 मध्ये प्रसारित झालेल्या या मालिकेने दोघांनाही प्रेक्षकांची पसंती मिळवून दिली. याच मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 2011 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.

आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.