देवमाणूस 2: अजिंत-डिंपलला महागात पडणार इन्स्पेक्टर जामकरच्या घरचा पाहुणचार

या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी एका नवीन व्यक्तिरेखेची एण्ट्री पाहिली. ती म्हणजे इन्स्पेक्टर मार्तंड जामकर (Milind Shinde). अजितकुमारला या पर्वात कोणाचाही धाक नाहीये असं वाटत असतानाच इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांची मालिकेत एण्ट्री झाली आणि मालिकेत एक रंजक वळण आलं.

देवमाणूस 2: अजिंत-डिंपलला महागात पडणार इन्स्पेक्टर जामकरच्या घरचा पाहुणचार
देवमाणूस 2Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 9:42 AM

‘देवमाणूस 2’ (Devmanus 2) या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनवर खिळवून ठेवलं आहे. देवमाणूस या मालिकेला पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी एका नवीन व्यक्तिरेखेची एण्ट्री पाहिली. ती म्हणजे इन्स्पेक्टर मार्तंड जामकर (Milind Shinde). अजितकुमारला या पर्वात कोणाचाही धाक नाहीये असं वाटत असतानाच इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांची मालिकेत एण्ट्री झाली आणि मालिकेत एक रंजक वळण आलं. मार्तंड जामकर आता अजितकुमारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार की नाही हे पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Zee Marathi)

प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की जामकरला संशय आहे की अजित या गावात एकटा नसणार. त्याला बज्या, नाम्या आणि डिंपल या तिघांवर शंका आहे. या तिघांपैकी कोणीतरी अजितला मदत करत असेल. नाम्या आणि बज्याची तो चौकशी करतो. त्याला कळतं की या दोघांचा यामध्ये हात नाहीये. उरली डिंपल, सेलिब्रिटी म्हणून तिला फोटो काढण्याच्या बहाण्याने स्टेशनला घेऊन जातो आणि दिवसभर बसवून ठेवतो. अजित या सर्व गोष्टींमुळे खूप अवस्थ आहे. डिंपलने जर तोंड उघडलं तर जामकरला पुरावे सापडतील. पण डिंपल तोंड उघडत नाही आणि याचा फायदा घेऊन अजित गावभर पसरवतो की देवमाणसाच्या पत्नीला नव्या पोलीस अधिकाऱ्याने दिवसभर स्टेशनमध्ये बसवून ठेवल आणि त्रास दिला. याच्यामुळे गावात जामकर विरोधात चर्चा सुरू होते आणि ती जामकारच्या कानावर पडते. तो प्रायश्चित्त म्हणून दोघांना घरी जेवायला यायला आमंत्रण देतो. त्याच वेळेला अजितला जमिनीसाठी आमदाराचं बोलावणं येतं.

आता दोघांपुढे नेमकं कुठे जायचं याचा पेच पडतो. ते दोघे जामकारच्या घरी जातात पण त्यांना आमदारकडे जायचंय म्हणून दोघेही अस्वस्थ आहेत. जामकर त्यांना जेवण वाढतो आणि म्हणतो की साग्रसंगीत जेवण केलं आहे तुमच्यासाठी साग्र झालं आता संगीत हवं असं म्हणून दोघांसाठी गाणं म्हणून डान्स करतो. अजित डिंपल मात्र घाबरलेले आहेत, जामकारचा यात काही डाव तर नसेल ना? जामकारचा हा पाहुणचार अजित आणि डिम्पलला महागात तर नाही पडणार? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.

हे सुद्धा वाचा

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.