Akshaya Deodhar: ‘पाठकबाईं’चं ज्या अभिनेत्यासोबत जोडलं होतं नाव; साखरपुड्याच्या फोटोंवर त्याच्याच कमेंटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

नुकतंच अक्षया (Akshaya Deodhar) आणि हार्दीकने साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. साखरपुड्याचे फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांकडून आणि कलाविश्वातील मंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच एका खास व्यक्तीच्या कमेंटने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

Akshaya Deodhar: 'पाठकबाईं'चं ज्या अभिनेत्यासोबत जोडलं होतं नाव; साखरपुड्याच्या फोटोंवर त्याच्याच कमेंटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
अक्षया देवधर आणि हार्दीक जोशी Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 9:11 AM

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सर्वांत लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि अभिनेता हार्दीक जोशी (Hardeek Joshi). राणा दा आणि पाठकबाईंच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली होती. नुकतंच अक्षया आणि हार्दीकने साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. अक्षया आणि हार्दीक एकमेकांना डेट करत असल्याचं कोणालाच माहित नव्हतं. किंबहुना दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कमालिची गुप्तता पाळली होती. आता साखरपुड्याचे फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांकडून आणि कलाविश्वातील मंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच एका खास व्यक्तीच्या कमेंटने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी अक्षयाचं नाव अभिनेता सुयश टिळकशी (Suyash Tilak) जोडण्यात आलं होतं. सुयश आणि अक्षया एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र या दोघांनी त्यांचं नातं कधीच ‘ऑफिशियल’ केलं नव्हतं किंवा त्याबद्दल कुठे व्यक्त झाले नव्हते. आता हार्दीकसोबत अक्षयाच्या साखरपुड्याच्या फोटोंवर सुयशच्या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

सुयशसोबत डिनर एंजॉय करताना किंवा ट्रॅव्हल करतानाचे फोटो अक्षया तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करायची. सुयशनेही अनेकदा तिच्यासोबतचे फोटो पोस्ट केले होते. कधी त्या फोटोंना ‘मिस यू’ कॅप्शन असायचं, तर कधी हृदयाचा इमोजी. मात्र याला अक्षया किंवा सुयशपैकी कोणीही कधीच दुजोरा दिला नव्हता. सुयशने गेल्या वर्षी अभिनेत्री आणि डान्सर आयुषी भावे हिच्याशी लग्नगाठ बांधली. 21 ऑक्टोबर 2021 रोजी तो लग्नबंधनात अडकला. त्याच्या सहा महिन्यांनंतर आता अक्षयाने हार्दीकशी साखरपुडा केला. या साखरपुड्याच्या फोटोंवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असता सुयशनेही ‘शुभेच्छा’ अशी कमेंट अक्षयाच्या फोटोवर केली. त्याच्या याच कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. मात्र काही वेळानंतर त्याने ही कमेंट डिलिट केली. तरी त्या कमेंटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पहा कमेंट-

हे सुद्धा वाचा

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचल्या अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. यातली त्यांचीही नावंही तितकीच गाजली, पाठक बाई आणि राणा दा…अशी नावं त्यांची या मालिकेत होती. मालिका संपल्यानंतरही दोघं नेहमीच चर्चेत राहिले. अक्षयाच्या स्टायलिश फोटोंची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.