AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hruta Durgule: “प्रत्येकजण हेच विचारतोय की खरं काय आहे”; ‘मन उडु उडु झालं’ मालिका सोडण्याच्या चर्चांवर अखेर हृताने सोडलं मौन

लग्नानंतर हृता ही मालिका सोडणार असल्याची जोरदार चर्चा होती. मालिकेच्या निर्मात्यांशी हृताचे काही वाद झाले आणि त्यामुळेच ती मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता खुद्द हृताने या चर्चांवर उत्तर दिलं आहे.

Hruta Durgule: प्रत्येकजण हेच विचारतोय की खरं काय आहे; 'मन उडु उडु झालं' मालिका सोडण्याच्या चर्चांवर अखेर हृताने सोडलं मौन
Man Udu Udu ZhalaImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 4:26 PM

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘मन उडु उडु झालं’ (Mann Udu Udu Zala) या लोकप्रिय मालिकेतील दिपू म्हणजेच अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तिच्या या व्यक्तिरेखेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. दिपू ही प्रेक्षकांना आपल्यातलीच एक वाटते, त्यामुळे प्रेक्षकांकडून हृताला या व्यक्तिरेखेसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. लग्नानंतर हृता ही मालिका सोडणार असल्याची जोरदार चर्चा होती. मालिकेच्या निर्मात्यांशी हृताचे काही वाद झाले आणि त्यामुळेच ती मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता खुद्द हृताने या चर्चांवर उत्तर दिलं आहे. ही मालिका सोडणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. “मी जेव्हापासून मालिकेत काम करायला सुरुवात केली, तेव्हापासूनच या चर्चांना उधाण आलंय आणि यामागचं कारण मला अजूनपर्यंत कळालेलं नाही. पण असं काहीच नाहीये. मी माझ्या लग्नासाठी अधिकृतरित्या रजा घेतली होती”, असं ती म्हणाली. हृताने नुकतीच दिग्दर्शक प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 15 दिवसांच्या सुट्ट्यांनंतर ती सोमवारपासून पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहे.

सेटवरील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून हृता नाराज होती असं म्हटलं जात होतं. त्यावर ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत हृता म्हणाली, “निर्मात्यांशी माझे नेहमीच चांगले संबंध होते. आमच्यात कोणताच वाद नव्हता. प्रत्येक शोमध्ये किंवा सेटवर कोणती ना कोणती सामान्य समस्या असतेच, पण आम्ही एकत्र काम करून त्यावर मार्ग काढतो. अशी एखादी गंभीर घटना घडलीच नाही, ज्याची एवढी चर्चा व्हावी. जर असं काही असतं, तर सर्वांत आधी मीच तुमच्यासमोर येऊन बोलले असते किंवा माझ्या सोशल मीडियावर पोस्ट लिहिली असती.”

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

“माझ्या सहकलाकाराने एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबत जाहिरातीचं शूटिंग केलं. त्यावरून ती नवी दिपू असेल का अशीही चर्चा झाली. प्रेक्षक जे वाचतात त्यावर विश्वास ठेवतात. अशा वेळी सर्वकाही कठीण असतं. प्रत्येकजण हेच विचारतो, खरं काय आहे? माझ्या सोशल मीडियावर असंख्य मेसेज आहेत, नाटकादरम्यान बॅकस्टेजला भेटणारे लोक मला याबद्दल विचारत आहेत. पण मला असं वाटतं माझ्या कामातूनच मी या चर्चांना उत्तर देईन. मी मालिकेत अजूनही काम करतेय. यापेक्षा अजून वेगळं स्पष्टीकरण कोणतं हवंय”, असं म्हणत तिने चर्चांना पूर्णविराम दिला.

इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.