Khatron Ke Khiladi 12: ‘खतरों के खिलाडी 12’मध्ये स्टंट करताना अभिनेत्रीला दुखापत; पोस्ट केला फोटो
दक्षिण आफ्रिकेला शूटिंग जाण्यापूर्वीही तिची तब्येत ठीक नव्हती. इतकंच नव्हे तर खतरों के खिलाडीच्या पत्रकार परिषदेलाही ती गैरहजर होती. यंदाच्या सिझनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला असून काही दिवसांपासून या शोच्या शूटिंगला सुरुवात झाली.
अभिनेत्री कनिका मान (Kanika Mann) सध्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये ‘खतरों के खिलाडी’च्या (Khatron Ke Khiladi 12) बाराव्या सिझनसाठी शूटिंग करत आहे. या शोमध्ये स्टंट (Stunts) करताना कनिकाला बरीच दुखापत झाली. याच दुखापतीचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘दुखापत होणे हा या शोचा एक भागच आहे’, असं तिने म्हटलंय. दक्षिण आफ्रिकेला शूटिंग जाण्यापूर्वीही तिची तब्येत ठीक नव्हती. इतकंच नव्हे तर खतरों के खिलाडीच्या पत्रकार परिषदेलाही ती गैरहजर होती. यंदाच्या सिझनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला असून काही दिवसांपासून या शोच्या शूटिंगला सुरुवात झाली. निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी या शोचं सूत्रसंचालन करतोय. या शोमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना अनेक स्टंट्स पूर्ण करावे लागतात.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कनिका म्हणाली, “होय, मला दुखापत झाली आहे. माझ्या हात आणि पायाला बरंच लागलंय. याबद्दल मी रोहित शेट्टी सरांना पण सांगितलं होतं. पण ते म्हणाले की आपल्या प्रेक्षकांना हे माहित नाही. तू स्ट्राँग खेळाडू आहेस म्हणून यात भाग घेतलास असं लोकांना वाटतं. तू स्ट्राँग आहेस हे सिद्ध करून दाखव. त्यामुळे स्टंट करताना थोडीफार दुखापत झाली तर तो या शोचा एक भागच आहे असं आम्ही समजतो.”
पहा फोटो-
View this post on Instagram
“स्टंट परफॉर्म करताना तुम्ही दुखापतग्रस्त आहात याची जाणीवसुद्धा होत नाही. तेवढी प्रेरणा शूटिंग करताना मिळते. एखाद्या स्पर्धकाने चांगला परफॉर्म केला तर आम्हाला त्याहून चांगलं करण्याची इच्छा होते. मी माझ्या दुखापतीचे फोटो काढले आणि ते माझ्या कुटुंबीयांना पाठवले. जणू काही मला ट्रॉफी मिळाल्यासारखंच मी ते मिरवत होते”, असं ती पुढे म्हणाली.
‘खतरों के खिलाडी’च्या याआधीच्या सिझनमध्येही बरेच कलाकार दुखापतग्रस्त झाले होते. तेजस्वी प्रकाशच्या डोळ्याला दुखापत झाल्यानंतर तिला तो शो मध्येच सोडावा लागला होता. पायाला जखम झाल्याने भारती सिंगलाही शोमधून बाहेर पडावं लागलं होतं. नंतर तिची जागा तिच्या पतीने घेतली होती.