Kon Honaar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व; 6 जूनपासून रंगणार ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ!

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या पर्वात यंदा ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.

Kon Honaar Crorepati: 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व; 6 जूनपासून रंगणार ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ!
Sachin KhedekarImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 7:45 AM

सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honaar Crorepati) हा बहुचर्चित कार्यक्रम येत्या 6 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. मागील वर्षी देखील या कार्यक्रमाच्या पर्वात अनेक ज्ञानी स्पर्धक सहभागी झाले होते आणि मोठी रक्कम त्यांनी जिंकली होती. यावर्षी देखील संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम स्पर्धक सहभागी होणार आहेत. ‘आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ’, असं यंदाच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करणार आहेत. ते एक अष्टपैलू कलाकार आहेतच. त्याचबरोबर त्यांच्याकडे उत्तम संवाद कौशल्य आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून स्पर्धक येत असतात. आणि येणाऱ्या प्रत्येकाशी ते खूप आपलेपणाने बोलत असल्याने स्पर्धकांना ते लगेच आपलेसे वाटतात. त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मानसिक धीर देणं हे काम ते मोठ्या खुबीने करतात.

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या पर्वात यंदा ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. सामान्य माणसानं आपल्या ज्ञानाच्या बळावर पैसे जिंकून आपली स्वप्नपूर्ती करावी, हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. विविध क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या वयोगटातले स्पर्धक यंदा सहभागी झाले आहेत. या पर्वात बहुमताचा कौल, व्हिडिओ अ फ्रेंड आणि बदली प्रश्न या तीन लाइफलाइन्स असणार आहेत.बदली प्रश्न या लाइफलाइनमध्ये एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत स्पर्धकाला आत्मविश्वास नसेल तर बदली प्रश्न ही लाईफलाईन वापरून प्रश्न बदलू शकतो.

हे सुद्धा वाचा

पहा प्रोमो-

यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून 6 लाखांपेक्षा अधिक फोन नोंदणी आले. यंदाही समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट ‘कोण होणार करोडपती’मध्ये होणार आहे. दर शनिवारच्या भागात ही मंडळी सहभागी होणार आहेत. मागच्या वर्षी नाना पाटेकर , आनंद शिंदे , यजुर्वेंद्र महाजन , मनोज वाजपेयी , सयाजी शिंदे , मेधा पाटकर , सोनाली कुलकर्णी , कनिका राणे यांसारखी मंडळी कर्मवीर विशेष भागात सहभागी झाली होती. या पर्वातही निरनिराळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना दर आठवड्याला रंगतदार भाग बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या पर्वात 18 वर्षांची एक तरुण मुलगी आणि 70 वर्षांची एक व्यक्ती देखील सहभागी झाली आहे. इतर सहभागी स्पर्धकांमध्ये डॉक्टर , पोलीस उपनिरीक्षक ,महिला बस चालक, स्टँडअप कॉमेडियन , एमपीएसी किंवा यूपीएससी पास झालेले विद्यार्थी, आर्मी ऑफिसर , फॉरेस्ट ऑफिसर आणि अगदी रेडिओ अनाऊन्सरदेखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, खेड्यापाड्यांतून सहभागी झाले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.