Mazhi Tuzhi Reshimgath: लग्नानंतर नेहाची पहिली वटपौर्णिमा; पत्नीसाठी यशसुद्धा करणार प्रार्थना

या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात नेहा आणि यश आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. या पूजेत यश जन्मोजन्मी नेहाच बायको म्हणून लाभु दे अशी प्रार्थना करतो.

Mazhi Tuzhi Reshimgath: लग्नानंतर नेहाची पहिली वटपौर्णिमा; पत्नीसाठी यशसुद्धा करणार प्रार्थना
Mazhi Tuzhi ReshimgathImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 10:36 AM
महाराष्ट्राला अनेक सण, व्रत-वैकल्य यांची संस्कृती लाभली आहे. त्यातील सौभाग्यवती महिलांचं सौभाग्य साजरं करणारा लोकप्रिय सण म्हणजे – वटपौर्णिमा (Vat Purnima). विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या व्रतामागे ‘सत्यवान आणि सावित्री’ यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा आहे. ही कथा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. आता हीच कथा मालिकेच्या स्वरूपात झी मराठी वाहिनीवर (Zee Marathi) सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळेल. तसंच प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांमध्ये वटपौर्णिमा या सणाचा विशेष भाग देखील पाहायला मिळेल. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath) या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. नुकतंच या मालिकेत यश आणि नेहा यांचा लग्नसोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला.
नेहा आणि यशचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, नेहाची मेहंदी, हळद यामध्ये घडलेली धमाल मजामस्ती हे सर्व तर प्रेक्षकांनी पाहिलंच, पण सोबत यश आणि नेहाचा लग्नसोहळादेखील डोळे दिपून टाकेल असा शानदार पद्धतीने संपन्न झाला. या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात नेहा आणि यश आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. या पूजेत यश जन्मोजन्मी नेहाच बायको म्हणून लाभु दे अशी प्रार्थना करतो. हा विशेष भाग रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram
हे सुद्धा वाचा

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहाची तर अभिनेता श्रेयस तळपदे हा यशची भूमिका साकारतोय. तर चिमुकल्या परीची भूमिका बालकलाकार मायरा वायकुळ साकारतेय. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना नेहा-यशच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता होती. रविवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये लग्नसोहळा दाखवण्यात आला. मात्र यावेळी काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली. अखेर झी मराठी वाहिनीने माफी मागत पुन्हा सोमवारी तो एपिसोड प्रसारित केला.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.