Video: मृण्मयी म्हणतेय, “का सांगू मी अशोक मामा कोणाशी लग्न करतायत?”; नेमकी काय आहे ही भानगड?
आपण नेहमी कलाकारांच्या लग्नाचा थाट फोटोंमधून पाहतो. पण जर प्रत्यक्षात जर आपल्याला एका सेलिब्रिटी जोडप्याचं लग्न पाहायला मिळालं तर? हो आता हे शक्य आहे. बँड बाजा वरात या कार्यक्रमात सेलिब्रिटींच लग्न लावलं जाणार आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘बँड बाजा वरात’ (Band Baja Varat) या कार्यक्रमाने अनेक नवं दाम्पत्यांना आहेर देऊन त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस अजून खास बनवला. आता या पर्वात प्रेक्षकांचे लाडके सेलिब्रिटी जोडपी सहभागी होणार आहेत. आपण नेहमी कलाकारांच्या लग्नाचा थाट फोटोंमधून पाहतो. पण जर प्रत्यक्षात जर आपल्याला एका सेलिब्रिटी जोडप्याचं लग्न पाहायला मिळालं तर? हो आता हे शक्य आहे. बँड बाजा वरात या कार्यक्रमात सेलिब्रिटींच लग्न लावलं जाणार आहे. मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) जेव्हा प्रोमोमध्ये म्हणते ‘का सांगू मी अशोक मामा (Ashok Saraf) कोणाशी लग्न करत आहेत?’ तेव्हा ते ऐकून सर्व प्रेक्षक गोंधळात पडले. या कार्यक्रमात प्रेक्षकांना कलाकारांच्या लग्नाची गंमत पहायला मिळणार असून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.
या कार्यक्रमातून प्रेक्षकांना प्रत्येक आठवड्यात सेलिब्रिटीजच्या लग्नाचा थाट, त्यांचा आतापर्यंतचा प्रवास, त्यातील गमती-जमती पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे सेलिब्रिटींनादेखील त्यांच्या लग्नातील काही खास क्षण पुन्हा एकदा जगायला मिळतील. या आठवड्यात प्रेक्षकांना अभिनेता भारत गणेशपुरे आणि त्यांच्या सौ आणि अभिनेत्री किशोरी शहाणे वीज आणि त्यांचे पती दीपक बलराज वीज यांच्या लग्नाची धूम पाहायला मिळेल. या कार्यक्रमाची सगळी धमाल मजा मस्ती प्रेक्षकांना येत्या 17 जून पासून रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram हे सुद्धा वाचा
या कार्यक्रमाच्या प्रोमोवर कमेंट्स करत प्रेक्षकांनी त्याविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी कलाविश्वात अत्यंत लोकप्रिय आहे. या दोघांची प्रेमकहाणी अनेकांना माहित असली तर त्यांच्या लग्नाचे क्षण पुन्हा एकदा पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.