Chala Hawa Yeu Dya: ‘अशोक मामांसोबत असं का?’, ‘चला हवा येऊ द्या’वर प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी

शोमधील विनोदांवरून कधी नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला, तर तोच तोचपणा येत असल्याचं काहींनी म्हटलं. आता या शोमध्ये अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना दुय्यम वागणूक दिल्याचं म्हटलं जातंय. सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे.

Chala Hawa Yeu Dya: 'अशोक मामांसोबत असं का?', 'चला हवा येऊ द्या'वर प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी
Chala Hawa Yeu DyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 1:52 PM

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील चला हवा येऊ द्या हा (Chala Hawa Yeu Dya) शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतोय. या कार्यक्रमात मराठी इंडस्ट्रापासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार हजेरी लावतात. मालिका असो, चित्रपट असो किंवा मग नाटक.. प्रमोशनसाठी अनेक दिग्गज कलाकार ‘थुकरटवाडी’त येतात. मात्र या शोवरून काही वादसुद्धा झाले. शोमधील विनोदांवरून कधी नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला, तर तोच तोचपणा येत असल्याचं काहींनी म्हटलं. आता या शोमध्ये अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना दुय्यम वागणूक दिल्याचं म्हटलं जातंय. सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे.

गेल्या महिन्यात अशोकमामांचा 75वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पाच दशकं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या अशोक मामांसाठी चला हवा येऊ द्या या शोमध्ये खास एपिसोड आयोजित करण्यात आला होता. हा एपिसोड प्रेक्षकांनी पाहिला, मात्र त्यातील एक गोष्ट त्यांना खटकली. काही दिवसांपूर्वीच ‘जुग जुग जियो’ या हिंदी चित्रपटातील कलाकारसुद्धा या शोच्या मंचावर आले होते. वरुण धवन, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर यांनी शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा चला हवा येऊ द्याचा परीक्षक स्वप्निल जोशी त्यांच्यासोबत एकत्र बसल्याचं दिसून आलं. परंतु अशोक सराफ यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वप्निल परीक्षकाच्या वेगळ्या खुर्चीत बसलेला दिसला. यावरूनच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

पहा ती पोस्ट-

‘जेव्हा बॉलिवूड कलाकार आले’ आणि ‘जेव्हा दिग्गज अशोक सराफ आले’ असे दोन फोटो एकत्र करत सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करण्यात आली. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे. मराठी कार्यक्रमातच मराठी कलाकारांना एक आणि बॉलिवूड कलाकारांना वेगळी वागणूक का दिली जाते, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला. मराठी कलाकारांची किंमत कधी ओळखणार, असाही सवाल एकाने केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.