AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lock Upp: विवाहित असताना दुसऱ्या पुरुषाला केलं होतं किस; निशा रावलचा खुलासा

निर्माती एकता कपूर आणि अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) यांचा 'लॉक अप' (Lock Upp) हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. आतापर्यंत या शोमध्ये विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासेसुद्धा केले. टीव्ही अभिनेत्री निशा रावल (Nisha Rawal) हिनेसुद्धा तिच्या वैवाहिक आयुष्यातील धक्कादायक खुलासा केला आहे.

Lock Upp: विवाहित असताना दुसऱ्या पुरुषाला केलं होतं किस; निशा रावलचा खुलासा
Nisha Rawal and Karan MehraImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 9:13 AM
Share

निर्माती एकता कपूर आणि अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) यांचा ‘लॉक अप’ (Lock Upp) हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. आतापर्यंत या शोमध्ये विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासेसुद्धा केले. टीव्ही अभिनेत्री निशा रावल (Nisha Rawal) हिनेसुद्धा तिच्या वैवाहिक आयुष्यातील धक्कादायक खुलासा केला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) आणि निशा रावल यांच्या वैवाहिक आयुष्यात जून 2021 मध्ये वादळ आलं होतं. निशाने करणविरोधात पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली होती. या भांडणादरम्यान काही मुलाखतींमध्ये करणने निशावर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले होते. आता ल़ॉक अप या शोमध्ये निशाने त्याची कबुली दिली. 2014 मध्ये निशाचा गर्भपात झाला होता. त्यावेळी तिला भावनिक साथ हवी होती, जी करणकडून मिळत नव्हती आणि त्यामुळेच ती दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित झाली, अशी कबुली निशाने दिली.

लॉक अपच्या या एपिसोडमध्ये एलिमिनेशनपासून स्वत:ला वाचवण्यासाठी निशाला तिच्या आयुष्यातील दुसऱ्या व्यक्तीबद्दलचा खुलासा करायचा होता. यावेळी निशा तिच्या गर्भपाताबद्दल आणि वैवाहिक आयुष्यातील समस्यांबद्दल व्यक्त झाली. “2012 मध्ये मी करणशी लग्न केलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये माझा गर्भपात झाला. अनेकांनी याबद्दल माहित असेल. पाच महिन्यांचं बाळ होतं आणि माझा गर्भपात झाला. करण माझं शारीरिक आणि मानसिक शोषण करत होता, हेसुद्धा अनेकांना माहित आहे. सेलिब्रिटी असल्याने मी कोणासमोर मोकळेपणे व्यक्त होऊ शकत नव्हती. समाज आणि मित्रमैत्रिणींकडून टीका होईल याची भीती मनात सतावत होती. कुटुंबीयांकडूनही मला साथ मिळत नव्हती. 2015 मध्ये मी माझ्या एका जुन्या मित्राला भेटले आणि त्याच्याकडे आकर्षित झाले. त्याचवेळी माझ्या चुलत बहिणीच्या संगीत कार्यक्रमात करणने माझ्यावर हात उगारला होता. याविषयी मला कुठेतरी व्यक्त व्हायचं होतं. मी त्या मित्राला भेटतेय हे करणला ठाऊक होतं. इतक कुठूनही साथ न मिळाल्याने मी त्याच्याकडे आकर्षित होणं खूपच स्वाभाविक होतं. अशाच एका क्षणी मी त्याला किस केलं. ज्यादिवशी ही घटना घडली, त्याचदिवशी मी करणकडे याबद्दल सांगितलं होतं. ”

निशाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल हा खुलासा केल्यानंतर कंगनाने तिचं कौतुक केलं. किमान आता तरी लोक तुला समजून घेतील आणि फक्त समाजासाठी लग्न टिकवून ठेवण्यात काही अर्थ नाही, असं कंगना तिला म्हणाली.

हेही वाचा:

काय आहे ‘शेर शिवराज’ची कथा? ‘पावनखिंड’च्या यशानंतर वाढली उत्सुकता

The Kashmir Files चे दिग्दर्शक Vivek Agnihotri यांच्यावर Me Too चे आरोप, सोशल मीडियावर चर्चाच चर्चा!

बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.