Prarthana Behere: Sorry sorry sorry म्हणत अखेर प्रार्थना बेहरेला मागावी लागली माफी

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत यश आणि नेहाचा लग्नसोहळा दाखवण्यात येत आहे. रविवारी या मालिकेचा दोन तासांचा विशेष भाग दाखवण्यात येणार होता. या एपिसोडसाठी चाहत्यांमध्ये फार उत्सुकता होती.

Prarthana Behere: Sorry sorry sorry म्हणत अखेर प्रार्थना बेहरेला मागावी लागली माफी
Prarthana BehereImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 1:07 PM

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath) ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी, त्यात चिमुकल्या परीचा निरागसपणा प्रेक्षकांना खूपच आवडला. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत यश आणि नेहाचा लग्नसोहळा दाखवण्यात येत आहे. रविवारी या मालिकेचा दोन तासांचा विशेष भाग दाखवण्यात येणार होता. या एपिसोडसाठी चाहत्यांमध्ये फार उत्सुकता होती. यश-नेहाचं लग्न, नेहा आणि परीचा डान्स या सर्वच गोष्टींची उत्कंठा वाढली होती. मात्र ऐनवेळी काही तांत्रिक अडचणींमुळे प्रेक्षकांची प्रचंड निराशा झाली. त्यामुळे आता मालिकेत नेहाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) हिने प्रेक्षकांची माफी मागितली आहे. त्याचप्रमाणे झी मराठी वाहिनीकडूनही (Zee Marathi) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

झी मराठी वाहिनीकडून स्पष्टीकरण-

‘काही तांत्रिक अडचणींमुळे माझी तुझी रेशीमगाठच्या आजच्या विवाह विशेष भागाच व्यत्यत आला. त्याबद्दल क्षमस्व. पण तुम्हा रसिकांसाठी हाच आनंद सोहळा आम्ही आज (13 जून) रोजी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता पुन्हा एकदा दाखवणार आहोत. त्यामुळे पहायला विसरू नका, नेहा आणि यशच्या लग्नाचा आनंद सोहळा,’ अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. हीच पोस्ट प्रार्थनानेही शेअर करत चाहत्यांची माफी मागितली. ‘सॉरी सॉरी सॉरी.. कृपया आज पुन्हा तो एपिसोड पहा. माझ्यावर भरभरून प्रेम केल्याबद्दल खूप धन्यवाद’, असं प्रार्थनाने लिहिलं.

हे सुद्धा वाचा

प्रार्थनाची पोस्ट-

नेमकं काय घडलं?

रविवारी रात्री 8 ते 10 दरम्यान ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा लग्नसोहळा विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. ही मालिका 8 वाजता सुरू झाली खरी, पण लगेच दहा मिनिटांची त्यात जाहिरात आली. ही जाहिरातच जवळपास पुढे 40 मिनिटांपर्यंत दाखवली गेली. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित नाराजी व्यक्त केली. अखेर 8 ते 10 ऐवजी 8 ते 11 पर्यंत ही मालिका प्रसारित करण्यात आली. आता तोच विशेष भाग प्रेक्षकांसाठी पुन्हा आज (सोमवारी) दाखवण्यात येणार आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-

प्रार्थनाने माफी मागताच नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘चालतंय की’ असं एकाने म्हटलं. तर ‘आज बघू तो एपिसोड’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं. ‘माफी नको मागू, आम्ही समजून घेऊ’, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय. या मालिकेत प्रार्थनासोबत अभिनेता श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे, मायरा वायकुळ यांच्याही भूमिका आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.