Bigg Boss 16 | सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, या तारखेपासून बिग बॉस 16 चे सीझन सुरू होणार, जाणून घ्या यंदाची थीम आणि स्पर्धेकांविषयी…

बिग बॉस 16 च्या प्रीमियरची तारीख जाहीर झाल्यानंतर, प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळते आहे. यावेळी कोणते सेलिब्रिटी बिग बॉस 16 च्या घरात येणार आहेत हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचे आहे. या यादीत पहिले नाव आले आहे ते म्हणजे मुनवर फारुकी यांचे.

Bigg Boss 16 | सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, या तारखेपासून बिग बॉस 16 चे सीझन सुरू होणार, जाणून घ्या यंदाची थीम आणि स्पर्धेकांविषयी...
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 3:38 PM

मुंबई : बिग बॉस (Bigg Boss) हा शो भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात चर्चित आणि प्रसिध्द शो आहे. या शोने अनेकांना ओळख निर्माण करून दिलीयं. हा एक लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. बिग बॉसमध्ये येऊन गेल्यानंतर अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल होतो आणि चाहत्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ देखील होते. पुन्हा एकदा हा शो त्याच्या नव्या सीझनसह (Season) परत येतोयं. बिग बॉस 16 साठी निर्मात्यांनी पूर्ण तयारी केली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान या शोला होस्ट करतो. आता बिग बाॅसच्या सीझन 16 ची तारीखही जाहिर झाल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस 16 हे 8 ऑक्टोबरपासून (October) सुरू होऊ शकते.

बिग बॉस 16 च्या प्रीमियरच्या दिवशी शहनाज गिल देखील सलमान खानसोबत दिसणार

बिग बॉस 16 च्या सीझनचे थीम खूप वेगळी असल्याचे बोलले जात आहे. बिग बॉस 15 साठी निर्मात्यांनी जंगल थीम निवडली होती. बिग बॉस 16 बद्दल असे बोलले जात आहे की यावेळी थीम Turqouise असू शकते. बिग बॉस 16 च्या प्रीमियरच्या दिवशी शहनाज गिल देखील सलमान खानसोबत शो होस्ट करताना दिसणार आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, यासंदर्भात निर्मात्यांकडून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य आले नाहीयं.

हे सुद्धा वाचा

यावेळी कोणते सेलिब्रिटी बिग बॉस 16 च्या घरात येणार?

बिग बॉस 16 च्या प्रीमियरची तारीख जाहीर झाल्यानंतर, प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळते आहे. यावेळी कोणते सेलिब्रिटी बिग बॉस 16 च्या घरात येणार आहेत हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचे आहे. या यादीत पहिले नाव आले आहे ते म्हणजे मुनवर फारुकी यांचे. मुनावर हा स्टँड-अप कॉमेडियन आहे. बिग बाॅस 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याने बिग बाॅसच्या बातम्यांकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. बिग बॉस 16 च्या घरात नेमके कोणत येणार यावरही आता चर्चा रंगताना दिसत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.