Saumya Tandon: कर्जात बुडालेल्या दिवंगत दीपेश भानच्या कुटुंबीयांची मदत करण्याचं आवाहन; सौम्या टंडनने घेतला पुढाकार

सौम्याने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात तिने चाहत्यांना दीपेश यांच्या कुटुंबाला 50 लाखांच्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी देणगी आणि मदत करण्याची विनंती केली आहे. यासोबतच तिने दीपेश यांच्यासोबतच्या गोड आठवणीही सांगितल्या आहेत.

Saumya Tandon: कर्जात बुडालेल्या दिवंगत दीपेश भानच्या कुटुंबीयांची मदत करण्याचं आवाहन; सौम्या टंडनने घेतला पुढाकार
Saumya Tandon: कर्जात बुडालेल्या दिवंगत दीपेश भानच्या कुटुंबीयांची मदत करण्याचं आवाहनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 10:14 AM

‘भाभीजी घर पर है’ (Bhabi Ji Ghar Par Hai) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सौम्या टंडनने (Saumya Tandon) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिवंगत अभिनेता दीपेश भान (Deepesh Bhan) यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सौम्याने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात तिने चाहत्यांना दीपेश यांच्या कुटुंबाला 50 लाखांच्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी देणगी आणि मदत करण्याची विनंती केली आहे. यासोबतच तिने दीपेश यांच्यासोबतच्या गोड आठवणीही सांगितल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये सौम्या म्हणते, “दीपेश भान आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी अजूनही आमच्यासोबत आहेत. तो अत्यंत बोलका होता आणि अनेकदा त्याच्या कुटुंबीयांबद्दल तो मनमोकलेपणे बोलत असे. त्याने आपल्या कुटुंबासाठी गृहकर्ज घेऊन एक घर खरेदी केलं होतं. त्याचं लग्न झालं आणि त्याला मुलगाही झाला. पण अचानक तो आम्हाला सोडून गेला. आता त्याचं घर आपण त्याच्या मुलाला देऊन त्याची परतफेड करू शकतो.”

हे सुद्धा वाचा

“मी एक फंड तयार केला आहे आणि जी काही रक्कम जमा होईल ती दीपेशच्या पत्नीला दिली जाईल, ज्याद्वारे ती गृहकर्ज फेडू शकेल. त्यामुळे कृपया दीपेशचं स्वप्न साकार करण्यात हातभार लावा,” असं ती पुढे म्हणाली. यासोबतच तिने फंड लिंक शेअर केली आहे.

दीपेश भान यांचा 23 जुलै रोजी क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. भाबी जी घर पर है या हिट मालिकेमध्ये त्यांनी मलखानची भूमिका साकारली होती. अभिनेता आसिफ शेखच्या म्हणण्यानुसार, दीपेश सकाळी सातच्या सुमारास जिममध्ये गेले होते आणि नंतर दहिसर इथल्या त्यांच्या बिल्डिंग कंपाऊंडमध्ये ते क्रिकेट खेळण्यासाठी थांबले आणि तिथेच ते कोसळले. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचं सांगण्यात आलं. दीपेशच्या पश्चात त्याची पत्नी आणि अठरा महिन्यांचा मुलगा आहे. दीपेश यांनी 2019 मध्ये लग्न केलं होतं.

मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?.
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'.
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही.
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी.
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल...
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल....
'अण्णा, ॐ नमः शिवाय!', पोलीस अधिकारी अन् कराडचं फोनवरील संभाषण व्हायरल
'अण्णा, ॐ नमः शिवाय!', पोलीस अधिकारी अन् कराडचं फोनवरील संभाषण व्हायरल.