Shehnaaz Gill: सिद्धू मूसेवालाच्या आठवणीत शहनाज गिलने केलं असं काही की नेटकऱ्यांनीही केलं कौतुक!

गुजरातमधील अहमदाबादमध्ये नुकत्याच पार पडलेल्या फॅशन शोमध्ये शहनाजने शो-स्टॉपर म्हणून हजेरी लावली. तिच्या करिअरमधील हा पहिलाच रॅम्प वॉक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Shehnaaz Gill: सिद्धू मूसेवालाच्या आठवणीत शहनाज गिलने केलं असं काही की नेटकऱ्यांनीही केलं कौतुक!
Shehnaaz GillImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 12:19 PM

‘बिग बॉस 13’ या रिॲलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिलने (Shehnaaz Gill) रॅम्पवर पदार्पण (ramp debut) केलं आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये नुकत्याच पार पडलेल्या फॅशन शोमध्ये शहनाजने शो-स्टॉपर म्हणून हजेरी लावली. तिच्या करिअरमधील हा पहिलाच रॅम्प वॉक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी शहनाज लाल रंगाच्या वधूच्या पोशाखात पहायला मिळाली. लेहंगा, भरजरी दागिने आणि मांगटिका असा तिचा हा लूक होता. रॅम्पवॉक करताना तिने पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moose Wala) गाण्यावर डान्ससुद्धा केला. हा व्हिडीओ शहनाजने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यावर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

शहनाजने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती सिद्धू मूसेवालाच्या ‘अखियाँ दे सामने’ या गाण्यावर नाचताना पहायला मिळतेय. फॅशन डिझायनर सामंत चौहानसाठी ती हा रॅम्प वॉक केला होता. ‘वधूच्या पोशाखात अत्यंत सुंदर दिसतेय’ असं एकाने लिहिलं. तर ‘वाह, सिद्धूचं गाणं आणि तुझा रॅम्प वॉक, माशाल्लाह’ अशा शब्दांत दुसऱ्या युजरने कौतुक केलं.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या मृत्यूचा तपास सध्या सुरू आहे. देशभरातील गायकांनी सिद्धूच्या हत्या प्रकरणाविषयी संताप केला. काहींनी आपल्या गाण्यातून त्याला श्रद्धांजली वाहिली. आता शहनाजने तिच्या पदार्पणाच्या रॅम्प वॉकदरम्यान सिद्धूच्या गाण्यावर डान्स केल्याने, चाहत्यांकडून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होतोय.

शहनाज बिग बॉस 13 या शोमुळे प्रकाशझोतात आली. या शोच्या अंतिम फेरीपर्यंत ती पोहोचली होती. याच शोदरम्यान दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाशी तिची खूप चांगली मैत्री झाली. या दोघांचा मोठा चाहतावर्ग असून सोशल मीडियावर ते ‘सिडनाज’ या नावाने ओळखले जाताता. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. आता हळूहळू ती त्यातून सावरत असल्याचं दिसून येत आहे. शहनाज लवकरच सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.