Swwapnil Joshi: ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत स्वप्नील जोशीचा हटके लूक; नेटकऱ्यांना भावतोय सौरभ पाजी

स्वप्नीलने (Swwapnil Joshi) या पंजाबी लुकमधील फोटोज सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहे. चाहत्यांचा या फोटोला आणि स्वप्निलच्या या पंजाबी लुकला चांगला प्रतिसाद मिळतोय.

Swwapnil Joshi: 'तू तेव्हा तशी' मालिकेत स्वप्नील जोशीचा हटके लूक; नेटकऱ्यांना भावतोय सौरभ पाजी
Swwapnil JoshiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 2:46 PM

झी मराठी वाहिनीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतील पट्या आणि अनामिकाची अव्यक्त प्रेम कहाणी हळुवार फुलताना प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. या मालिकेतील सौरभ म्हणजेच स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi) आणि अनामिका म्हणजेच शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) यांच्या व्यक्तिरेखा आणि त्यांची जोडी देखील प्रेक्षकांना आवडली आहे. आता या मालिकेत प्रेक्षक पाहू शकतील की सौरभच्या घरी जे पाच लाख आलेले आहेत, त्यातून वल्ली दागिन्यांची खरेदी करते. ते दागिने खोटे आहेत हे अनामिका सांगते. आता ते पाच लाख परत आणण्यासाठी सौरभ मधला पट्या जागा होतो आणि सर्वसामान्य माणसांची फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे हे सौरभ मनाशी ठरवतो.

सोनाराच्या दुकाना बाहेर आपल्याला गर्दी दिसते अनेकांची फसवणुक झालेली आहे. त्या फसवणूक करणाऱ्या माणसांना धडा शिकवण्यासाठी सौरभ पंजाबी माणसाचं रूप घेतो आणि त्या माणसांना शोधून चांगला चोप देतो. सौरभच्या या पंजाबी लूकमुळे प्रेक्षकांची हा भाग बघण्याची उत्सुकता खूप वाढली आहे. स्वप्नीलने या पंजाबी लुकमधील फोटोज सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहे. चाहत्यांचा या फोटोला आणि स्वप्निलच्या या पंजाबी लुकला चांगला प्रतिसाद मिळतोय.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

या मालिकेतील सौरभ, अनामिका या प्रमुख व्यक्तिरेखांप्रमाणेच पुष्पावल्ली, चंद्रलेखा, चंदू चिमणे या व्यक्तिरेखांवर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सौरभ आणि अनामिकाच्या अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना आवडतेय. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना रंजक वाटत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.