Dhanashree Kadgaokar: ‘वहिनीसाहेबां’चं मालिकेत कमबॅक; पुन्हा एकदा साकारणार नकारात्मक भूमिका

वहिनीसाहेब ही भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaokar) आता पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं' (Tu Chal Pudha) या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.

Dhanashree Kadgaokar: 'वहिनीसाहेबां'चं मालिकेत कमबॅक; पुन्हा एकदा साकारणार नकारात्मक भूमिका
पुन्हा एकदा साकारणार नकारात्मक भूमिकाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 8:50 AM

तुझ्यात जीव रंगला (Tujhyat Jeev Rangala) या लोकप्रिय मालिकेतील वहिनीसाहेब ही व्यक्तिरेखा अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. वहिनीसाहेबांचा धाक आणि दरारा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. वहिनीसाहेब ही भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaokar) आता पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ (Tu Chal Pudha) या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून ही मालिका येत्या 15 ऑगस्ट पासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल. गेल्या वर्षी धनश्रीने मुलाला जन्म दिला. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. गरोदरपणात तिने कामातून ब्रेक घेतला होता. इन्स्टाग्रामवर सक्रिय असणारी धनश्री तिच्या मुलासोबतचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना धनश्री म्हणाली, “या मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेचं नाव शिल्पी आहे, जी तिच्या माहेरी येऊन राहतेय आणि तिला सतत असं वाटतं की तिच्या आयुष्यात जे काही चुकीचं घडलं त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त अश्विनी आहे. त्यामुळे शिल्पी अश्विनीला सतत घालून पडून बोलते, प्रत्येक गोष्टींमध्ये तिच्या चुका काढते जसं प्रोमोमध्ये देखील प्रेक्षकांनी पाहिलं की शिल्पी कशी तिच्या वहिनी अश्विनीला टोमणे मारते. अशा प्रकारची एक नकारात्मक भूमिका पुन्हा एकदा मी साकारतेय. त्यामुळे जशी वहिनीसाहेब सगळ्यांच्या लक्षात राहिली तशीच शिल्पी देखील प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी मी आशा करते.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकेतूनही धनश्री प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून धनश्री घराघरात पोहोचली. तिची ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका चांगलीच गाजली. मालिका विश्वात सक्रिय असतानाच 2013मध्ये धनश्रीने दुर्वेशसोबत लग्नगाठ बांधली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.