‘तुझ्या माझ्या संसाराला..’मध्ये रेवाच्या एण्ट्रीमुळे सिड-अदितीमध्ये रंगणार चुरस

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tujhya Majhya Sansarala Ani Kaay Hawa) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि आता ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत नुकतीच रेवा दीक्षित ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीस आली.

'तुझ्या माझ्या संसाराला..'मध्ये रेवाच्या एण्ट्रीमुळे सिड-अदितीमध्ये रंगणार चुरस
Veena JagtapImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 1:25 PM

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tujhya Majhya Sansarala Ani Kaay Hawa) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि आता ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत नुकतीच रेवा दीक्षित ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीस आली. ही भूमिका साकारणारा चेहरा हा प्रेक्षकांच्या ओळखीचा आणि आवडीचा आहे. अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap) हिने रेवाच्या भूमिकेतून या मालिकेत एण्ट्री केली आहे. रेवा ही एक फायनान्सर आहे आणि ती देशमुख परिवारातील सिड आणि अदितीमध्ये बिझनेसच कौशल्य हेरून त्यांच्या बिझनेसला फायनान्स करायचं की नाही हा निर्णय घेणार आहे.

प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की अदितीने रेवाचा अपमान केल्यामुळे रेवाला राग येतो. आता मालिकेत पुढे असं घडणार आहे की रेवा सिद्धार्थला फायनान्स द्यायचं ठरवते. सिद्धार्थ आणि रेवा मधील मैत्रीचा आपण चुकीचा अर्थ घेतला याचं अदितीला वाईट वाटतं. ती रेवाची माफी मागते आणि स्वतःला बायको आणि बिझनेस वुमन म्हणून सिद्ध करण्यासाठी दोन दिवस मागते. सगळे देशमुख अदितीच्या पाठीशी उभे रहातात. आता सिद्धार्थची अस्वस्थता वाढते. त्याच्या हातून रेवा फायनान्स देणार आहे ती संधी निघून जाते की काय अशी त्याला भिती वाटते. रेवा नक्की कोणाला फायनान्स देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

रेवामुळे येईल का अदिती आणि सिद्धार्थमध्ये दुरावा?

रेवाच्या भूमिकेबद्दल बोलताना वीणा म्हणाली, “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या लोकप्रिय मालिकेत मी रेवाची महत्वपूर्ण भूमिका साकारतेय आणि रेवाने अशा एका विलक्षण वळणावर मालिकेत एण्ट्री घेतली आहे. त्यामुळे मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे याचा मला खूप आनंद आहे. रेवाची एण्ट्री मालिकेत झाल्यापासून मला प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया आणि त्यांचं प्रेम मिळतंय. प्रेक्षकांना रेवाला पाहायला आवडतंय हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. रेवा आता पुढे काय काय करणार? कोणाला फायनान्स देणार? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.” तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

हेही वाचा:

Ranbir Alia Wedding: “लवकरच बाबा हो आणि..”; लग्नाच्या चर्चांवर संजय दत्तचा रणबीर कपूरला सल्ला

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या प्रेमकहाणीला कधी, कुठे अन् कशी सुरुवात झाली?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.