AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urvashi Rautela: ‘छोटू भैय्या’ म्हटल्यानंतर आता उर्वशीने मागितली ऋषभ पंतची माफी

2018 मध्ये उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या दोघांना अनेकदा रेस्टॉरंटमध्ये, पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं.

Urvashi Rautela: 'छोटू भैय्या' म्हटल्यानंतर आता उर्वशीने मागितली ऋषभ पंतची माफी
Urvashi Rautela and Rishabh PantImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 5:51 PM
Share

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि टीम इंडियाचा क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. हॉटेलच्या लॉबीमध्ये ऋषभ माझी वाट पाहत उभा होता, असा खुलासा उर्वशीने एका मुलाखतीत केला होता. मात्र ऋषभने या चर्चा फेटाळल्या आणि तेव्हापासूनच दोघांमध्ये सोशल मीडियावर वाद सुरू झाला. एकमेकांचं थेट नाव घेता दोघांनी उत्तर-प्रत्युत्तर दिले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशीला पुन्हा एकदा ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

2018 मध्ये उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या दोघांना अनेकदा रेस्टॉरंटमध्ये, पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. त्याचवर्षी नंतर दोघांनी एकमेकांना ब्लॉक केल्याचंही म्हटलं जात होतं. 2019 मध्ये ऋषभने उर्वशीला डेट करत असल्याच्या चर्चांना साफ नाकारलं. त्याचसोबत इशा नेगीला डेट करत असल्याचं त्याने जाहीर केलं.

उर्वशीने नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी तिला ऋषभ पंतबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना उर्वशी म्हणाली, “सिधी बात नो बकवास आणि त्यामुळेच मी इथे कोणतीही बकवास करणार नाही.” एका पत्रकाराने उर्वशीला पुढे विचारलं की तिचा ऋषभसाठी काही मेसेज आहे का? त्यावर डोळे फिरवत ती म्हणाली, “मला इतकंच म्हणायचं आहे की… काहीच नाही. मला माफ करा.”

उर्वशी-ऋषभ पंतचा वाद

ऋषभ पंत हा तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या बाल्कनीमध्ये तिची वाट पाहत होता, असं उर्वशीने थेट नाव न घेतला सूचित केलं होतं. त्यावर ऋषभनेही इन्स्टा स्टोरीमध्ये उर्वशीला उत्तर दिलं होतं. ‘लोकप्रियता मिळवण्यासाठी काही जण खोटं बोलतात’, असंच तो थेट या पोस्टमध्ये म्हणाला होता. त्यानंतर भडकलेल्या उर्वशीने लिहिलं, ‘छोटू भैय्याने बॅट-बॉलच खेळलं पाहिजे. बदनाम होण्यासाठी मी काही मुन्नी नाही. डार्लिंग तुला रक्षाबंधनच्या शुभेच्छा.’

एका मुलाखतीत उर्वशीने तिच्या दिल्लीतील शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला होता. या मुलाखतीत तिने असा दावा केला होता की कोणीतरी तिला भेटण्यासाठी रात्रभर वाट पाहत होतं. ती म्हणाली, “आरपी (RP) हॉटेलच्या लॉबीमध्ये आला होता आणि त्याला मला भेटायचं होतं. दहा तास झाले होते आणि मी झोपली होती. मी एकही कॉल अटेंड करू शकले नाही आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा मला 16-17 मिस्ड कॉल दिसले आणि मला खूप वाईट वाटलं की कोणीतरी माझी वाट पाहत होतं आणि मी त्यांना भेटू शकले नाही. मी त्याला म्हणाले की मुंबईला गेल्यावर भेटू. आम्ही मुंबईत भेटलो पण पापाराझींमुळे खूप मोठा ड्रामा झाला.”

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.