प्रसिद्ध अभिनेत्रीचं रस्ते अपघातात निधन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, चाहत्यांना मोठा धक्का

चित्रीकरण आटोपून घरी येत असताना प्रसिद्ध अभिनेत्रीचं रस्ते अपघातात निधन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर... लोकप्रिय अभिनेत्रीच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का

प्रसिद्ध अभिनेत्रीचं रस्ते अपघातात निधन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, चाहत्यांना मोठा धक्का
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 12:53 PM

मुंबई : झगमगत्या विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. चित्रीकरण आटोपून घरी येत असताना प्रसिद्ध अभिनेत्रीचं रस्ते अपघातात निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथील बारानगर येथे एका अभिनेत्रीचं निधन झालं आहे. अभिनेत्रीला लॉरीने धडक दिल्याने मृत्यू झाला. सुचंद्र दासगुप्ता असं अपघातात निधन झालेल्या अभिनेत्रीचं नाव आहे.. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनूसार, शनिवारी रात्री सुचंद्र दासगुप्ता बाईकवरून शूटिंग करून घरी परतत होती. बारानगर पोलीस ठाण्याच्या घोषपाडाजवळ एका ट्रकने बाईकला धडक दिली. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातात अभिनेत्रीचा जागीत मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

घटनेची तपासणी करण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. ऑफलाईन बूक करण्यात आलेल्या बाईक चालकासोबत संपर्क करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेक लावताच अभिनेत्री दुचाकीवरून खाली पडली. तितक्यात पाठीमागून एक दहाचाकी ट्रक येत होता. अभिनेत्रीने हेल्मेट देखील  घातला होता. तरी देखील अपघातात अभिनेत्रीचं निधन झालं…

अभिनेत्रीचं घर बारानगरमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी रात्री शूटिंग आटोपल्यानंतर ती बाईकने परतत होती. घरी परतत असताना अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला… अभिनेत्रीच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. अभिनेत्रीच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला.. सुचंद्र दासगुप्ता हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नाव होतं.

हे सुद्धा वाचा

सुचंद्र दासगुप्ता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बंगाली मालिका ‘गौरी’मध्ये सह-अभिनेत्री म्हणून काम करत होती. या मालिकेतून सुचंद्र दासला खूप प्रसिद्धी मिळाली. मालिकेमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. शिवाय तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती. अभिनेत्रीच्या निधनानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र सुचंद्र दासगुप्ता हिच्या अपघाताची चर्चा रंगत आहे.

सुचंद्र दासगुप्ता हिला बंगाली मालिका ‘गौरी’मुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. आवडत्या क्षेत्रात स्वतःचं नाव मोठं होत असताना, अभिनेत्रीचं निधन झाल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे… करियरच्या शिखरावर चढत असताना आपलं हे शेवटचं शूट आहे.. हे सुचंद्र दासगुप्ता हिला ठावून नव्हतं. सुचंद्र दासगुप्ता हिला प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख तयार करायची होती.. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं…

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.