Bigg Boss OTT 2 | युट्यूबर्सच्या शर्यतीत पूजा भट्ट मारणार बाजी? ‘या’ कारणांमुळे ठरू शकते विजेती

बिग बॉस ओटीटी 2 चा ग्रँड फिनाले येत्या 14 ऑगस्ट रोजी जिओ सिनेमावर रात्री 9 वाजल्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर विजेत्याबद्दल विविध अंदाज वर्तवले जात आहेत.

Bigg Boss OTT 2 | युट्यूबर्सच्या शर्यतीत पूजा भट्ट मारणार बाजी? 'या' कारणांमुळे ठरू शकते विजेती
Pooja BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 8:34 PM

मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा लोकप्रिय शो सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. येत्या 14 ऑगस्ट रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजेता घोषित करण्यासाठी शेवटच्या आठवड्यात चाहते जबरदस्त वोटिंग करत आहेत. तर ग्रँड फिनालेच्या एक आठवड्याआधी ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये डबल एलिमिनेशन झालं. अविनाश सचदेव आणि जद हदिद हे दोन स्पर्धक बेघर झाले. सध्या टॉप 6 स्पर्धकांमध्ये बेबिका धुर्वे, एल्विश यादव, अभिषेक मल्हान, मनीषा राणी, पूजा भट्ट आणि जिया शंकर यांचा समावेश आहे. यंदाचा सिझन कोण जिंकणार याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. एल्विश आणि अभिषेक या दोघांपैकी कोणीतरी विजेतेपदाचा दावेदार ठरू शकतो, असा अंदाज अनेकजण वर्तवत आहेत.

बिग बॉस ओटीटीच्या यंदाच्या सिझनमध्ये युट्यूबर्सचं पारडं जड असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र एल्विश आणि अभिषेकच्या या लढाईत अभिनेत्री पूजा भट्टला कमकुवत स्पर्धक मानणं चुकीचं ठरेल. या दोघांवर मात करत पूजासुद्धा या सिझनची विजेती ठरू शकते. यामागचं कारण म्हणजे पहिल्या दिवसापासून पूजाची खेळी दमदार आहे. अनेकदा खेळादरम्यान स्पर्धकांकडून मर्यादा ओलांडल्या जातात. मात्र पूजा टास्कदरम्यान मर्यादा पाळून खेळताना दिसली.

जिया शंकरच्या आईनेही पूजाच्या खेळीचं कौतुक केलं होतं. “पूजाने बिग बॉसच्या घराला खरं घर बनवलं आहे. तिच्यामुळे बिग बॉसच्या घरात मर्यादांचं पालन होतंय. ती या शोमध्ये कधीच हिंसक होऊन खेळली नाही”, असं त्या म्हणाल्या होत्या. टीआरपीसाठी किंवा एखाद्या एपिसोडमध्ये प्रकाशझोतात येण्यासाठी तिने तिच्या मूल्यांशी तडजोड केली नाही. नॉमिनेशन्स किंवा टास्कमधील अपयश यांमुळेही ती कधी डगमगताना दिसली नाही.

हे सुद्धा वाचा

बिग बॉसचा विजेता कोण ठरू शकतो असा प्रश्न जेव्हा पूजाला विचारण्यात आला, तेव्हा तिने अभिषेक मल्हानचं नाव घेतलं. मात्र गेल्या आठवड्यापासून अभिषेकबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे याचा फायदा पूजा भट्टला होऊ शकतो. बिग बॉस ओटीटी 2 चा ग्रँड फिनाले येत्या 14 ऑगस्ट रोजी जिओ सिनेमावर रात्री 9 वाजल्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर विजेत्याबद्दल विविध अंदाज वर्तवले जात आहेत. अखेरच्या टप्प्यात एल्विश आणि अभिषेक या दोघांमध्ये टक्कर होणार असल्याचा दावा काही नेटकरी करत आहेत.

Bigg Boss OTT Season 2 Finale LIVE

बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.