Video: रॉकी भाई-पुष्पाराजची ग्रेट भेट; साऊथ सुपरस्टार्सचा व्हिडीओ व्हायरल

अल्लू अर्जून आणि यशने नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात एकमेकांची भेट घेतली. या दोघांची ही ग्रेट भेट चांगलीच चर्चेत आली आहे. ट्विटरवर या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Video: रॉकी भाई-पुष्पाराजची ग्रेट भेट; साऊथ सुपरस्टार्सचा व्हिडीओ व्हायरल
Video: रॉकी भाई-पुष्पाराजची ग्रेट भेटImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 6:58 PM

केजीएफ या कन्नड चित्रपटातील यश (Yash) आणि पुष्पा या तेलुगू चित्रपटातील अल्लू अर्जुन (Allu Arjun) यांनी आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर विशेष छाप सोडली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील या दोन्ही चित्रपटांना आणि कलाकारांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. केजीएफ: चाप्टर 2 बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. तर पुष्पाचा (Pushpa) सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच या दोन्ही सुपरहिट चित्रपटांमधील सुपरहिट कलाकारांना एकाच फ्रेममध्ये पाहिलं गेलं.

अल्लू अर्जून आणि यशने नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात एकमेकांची भेट घेतली. या दोघांची ही ग्रेट भेट चांगलीच चर्चेत आली आहे. ट्विटरवर या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रॉकिंग स्टार आणि आयकॉनिक स्टारची भेट असे कमेंट्स चाहते करत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये दोघं एकमेकांशी हस्तांदोलन करत हसत बोलताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

साऊथ इंडियन इंटरनॅशलन अवॉर्ड्स सोहळा हा शनिवारी बेंगळुरूमध्ये पार पडला. यावेळी तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील विजेत्यांची घोषणा झाली. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या चारही भाषांमधील कलाकार या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. बॉलिवूड स्टार रणवीर सिंगनेही या सोहळ्याला खास हजेरी लावली होती. यावेळी त्याने अल्लू अर्जुनसमोर पुष्पामधील लोकप्रिय डायलॉग बोलून दाखवला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पूजा हेगडेनं पटकावला. तर अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. विजय देवरकोंडाला युथ आयकॉन साऊथच्या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.