किम कार्दशियनसारखं दिसण्यासाठी केले 40 कॉस्मेटिक ऑपरेशन्स; आता मूळ रुपात परत येण्यासाठी केली कोट्यवधींची सर्जरी, चेहऱ्याची झाली अशी अवस्था

आता पुन्हा पहिल्यासारखं दिसण्यासाठी, आपलं रुप परत मिळवण्यासाठी (detransition) तिला 120 हजार डॉलर्स खर्च करावे लागत आहेत. दुसऱ्या व्यक्तीसारखं दिसण्याच्या मोहामायी जेनिफर आपलं मूळ रुप आणि सौंदर्य हरवून बसली आहे.

किम कार्दशियनसारखं दिसण्यासाठी केले 40 कॉस्मेटिक ऑपरेशन्स; आता मूळ रुपात परत येण्यासाठी केली कोट्यवधींची सर्जरी, चेहऱ्याची झाली अशी अवस्था
Jennifer PamplonaImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 1:34 PM

हॉलिवूड स्टार आणि मॉडेल किम कार्दशियनच्या (Kim Kardashian) सौदर्याची चर्चा ही जगभरात आहे. तिच्या चाहत्यांमध्ये केवळ पुरुषच नाही तर असंख्य स्त्रियांचाही समावेश आहे. किमसारखी फिगर व्हावी यासाठी तरुणी काहीही करण्यासाठी तयार असतात. अशाच एका मॉडेलने किमसारखं दिसण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. इतकंच नव्हे तर तिच्यासारखी फिगर आणि सौंदर्य मिळवण्याच्या नादात तिने स्वत:समोर अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. वर्सासे या प्रसिद्ध ब्रँडची मॉडेल जेनिफर पॅम्प्लोना (Jennifer Pamplona) हिने आधी किम कादर्शियनसारखं दिसण्यासाठी तब्बल 600 हजार डॉलर्स खर्च केले होते. आता पुन्हा पहिल्यासारखं दिसण्यासाठी, आपलं रुप परत मिळवण्यासाठी (detransition) तिला 120 हजार डॉलर्स खर्च करावे लागत आहेत. दुसऱ्या व्यक्तीसारखं दिसण्याच्या मोहापायी जेनिफर आपलं मूळ रुप आणि सौंदर्य हरवून बसली आहे.

40 कॉस्मेटिक ऑपरेशन्स

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, 29 वर्षीय जेनिफरने किम कार्दशियनसारखं दिसण्यासाठी 12 वर्षांच्या कालावधीत सुमारे 40 कॉस्मेटिक ऑपरेशन्स केल्या होत्या. एवढं सगळं करूनही हे सर्व फक्त वरवरचं समाधान देणारं होतं, याची जाणीव तिला अखेर झाली. “लोक मला कार्दशियन म्हणायचे आणि काही काळानंतर ते त्रासदायक वाटू लागलं,” असं तिने ‘केटर्स’ला सांगितलं. “मी काम केलं, अभ्यास केला आणि मी एक व्यावसायिकसुद्धा होती. मी या सर्व गोष्टी केल्या होत्या. वैयक्तिक आयुष्यात एवढं सगळं करूनसुद्धा मला लोक फक्त किम कार्दशियनसारखी दिसणारी म्हणून ओळखायचे”, अशी खंत तिने व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

किम कार्दशियनसारखी दिसू लागल्याने मिळाली प्रसिद्धी

पॅम्प्लोना 17 वर्षांची असताना तिच्यावर पहिल्यांदा शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी किम कार्दशियनला लोकप्रियता मिळवण्यास सुरुवात झाली होती. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर पॅम्प्लोनाला मोठी सेलिब्रिटीसारखी दिसू लागेल अशा सर्जरी करण्याचं जणू व्यसनच लागलं होतं. तीन ऱ्हिनोप्लास्टिस, बट इम्प्लांट आणि फॅट इंजेक्शन्ससह पार्श्वभागावर आठ ऑपरेशन्स, असे तिच्यावर 40 हून अधिक उपचार झाले होते. हे सर्व केल्यानंतर ती किम कार्दशियनसारखी दिसू लागल्याने तिला प्रसिद्धी मिळत गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘द पोस्ट’ या प्रसिद्ध मासिकानेही तिची दखल घेतली होती. इन्स्टाग्रामवर तिचे एक दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स झाले होते. पण एवढं सगळं करूनही तिला अपेक्षित असा आनंद, मानसिक समाधान मिळू शकलं नाही.

शस्त्रक्रियांचं व्यसन

“मला हे समजून चुकलं होतं की मला शस्त्रक्रियांचं जणू व्यसन जडलंय आणि एवढं सगळं करूनही मी आनंदी नाही. एखाद्या सुपरमार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करावं त्याप्रमाणे मी माझ्या चेहऱ्यावर फिलर टाकत होते. हे एक व्यसन होतं आणि मी प्रसिद्धी, पैसा आणि शस्त्रक्रियेच्या चक्रात अडकत गेले. मी माझ्या सर्व गोष्टींवरून नियंत्रण गमावलं होतं,” अशी कबुली जेनिफरने दिली. अनेव वर्षं या अस्वस्थतेत राहिल्यानंतर आता तिला पुन्हा मूळ रुपात यायचंय आणि यासाठी ती प्रयत्न करतेय. आपल्याला इस्तांबूलमध्ये एक डॉक्टर सापडला असून त्याने दावा केला की तो तिला तिच्या मूळ रुपात आणू शकेल, असं ती म्हणाली. “मी कशी दिसेन, हे त्याने मला आधी कम्प्युटरवर पाहिलं होतं आणि मला जणू पुनर्जन्मच मिळाल्यासारखं वाटत होतं,” असं जेनिफनरे सांगितलं.

पहा फोटो-

डिट्रान्झिशन प्रक्रियेनंतर गालातून रक्तस्राव

आपल्या मूळ रुपात परत जाण्याची सर्जरी मात्र जेनिफरला महागात पडली. “फेस आणि नेक लिफ्ट, बक्कल फॅट रिमूव्हल, कॅट आय सर्जरी, लिप लिफ्ट, नाकाची सर्जरी असं सगळं एकत्रच केलं होतं. ऑपरेशन रुममध्ये मी एक व्यक्ती म्हणून गेले होते आणि बाहेर दुसरीच व्यक्ती बनून पडले”, असं जेनिफर म्हणाली. डिट्रान्झिशन प्रक्रियेनंतर जेनिफरला अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागलं. तीन दिवस तिच्या गालातून रक्तस्त्राव होऊ लागला होता. आपण आपलं आयुष्य गमावतोय की काय अशी भीती तिला जाणवू लागली. सुदैवाने, सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे. मात्र अजूनही सूज आणि जखमा दिसत असल्याने सर्जरीचा अंतिम परिणाम कसा दिसेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. ही संपूर्ण प्रक्रिया वेदनादायी असेल याची आधीच कल्पना असल्याचं जेनिफरने स्पष्ट केलं.

उशिरा सुचलेलं शहाणपण

“सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे मी आता माझ्या अस्तित्वाशीच लढा देत नाहीये. ही सर्वांत चांगली भावना आहे. मला जसं व्हायचं होतं तसं मी आता आहे आणि मला आता खरोखरच जीवनाचा अर्थ समजला आहे. असे अनेक लोक आहेत जे इंस्टाग्रामवर छान दिसण्यासाठी सर्जरी करतात. परंतु आयुष्य हे कधीच परफेक्ट नसतं आणि सर्जरीचं व्यसन असणं ही चांगली गोष्ट नाही,” असं तिने स्पष्ट केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.