Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | ही औषधी वनस्पती संधिवातसाठीच नाही तर आरोग्याच्या या समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर!

ब्राह्मीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. हे अँटिऑक्सिडंट पेशींमधून हानिकारक दूषित पदार्थ बाहेर टाकतात. यामुळेच कर्करोगाचा धोका खूप कमी होतो. तसेच ज्यांना कर्करोग झाला आहे, अशांनी देखील या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा.

Health | ही औषधी वनस्पती संधिवातसाठीच नाही तर आरोग्याच्या या समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर!
Image Credit source: indiamart.com
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 10:14 AM

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून विशेष: कोरोनापासून आयुर्वेदिक (Ayurvedic) औषधी वनस्पतींचा वापर चांगलाच वाढला आहे. पूर्वी ताप, सर्दी आणि खोकला आली की, लोक लगेचच डाॅक्टरांकडे जाऊन औषधे घेत होती. मात्र, कोरोनापासून आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेकजण आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर करताना दिसत आहेत. तसेच निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यासाठी औषधी वनस्पती फायदेशीर आहेत, हे सर्वांना समजले. ब्राह्मी या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. ही भाजी प्रामुख्याने ओल्या जमिनीत कुठेही येते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ब्राह्मी (Brahmi) खूप उपयुक्त आहे. या भाजीची चव थोडीशी कडू आहे. मात्र, ही आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. ब्राह्मी ही भाजी बाजारामध्ये मिळत नसेल तर तुम्ही अगदी सोप्या पध्दतीने आपल्या घरातील गार्डनमध्ये देखील लावू शकता.

संधिवात

ब्राह्मी ही भाजी संधिवात आणि जळजळ कमी करण्यासाठी मदत करते. ज्यांना गॅस्ट्रिकचा आणि अल्सरच्या त्रास आहे. अशांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये ब्राह्मीचा समावेश करावा. जर आपल्याला दररोज ही भाजी बनवून खाणे शक्य नसेल तर आपण भाजी स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडेसे तूप टाकूनही खाऊ शकतो. यामुळे भाजीचा कडूपणा कमी होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

कर्करोग

ब्राह्मीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. हे अँटिऑक्सिडंट पेशींमधून हानिकारक दूषित पदार्थ बाहेर टाकतात. यामुळेच कर्करोगाचा धोका खूप कमी होतो. तसेच ज्यांना कर्करोग झाला आहे, अशांनी देखील या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा.

रोगप्रतिकारक शक्ती

ब्राह्मीच्या भाजीमध्ये रोगाशी लढण्याचे गुणधर्म भरपूर आहेत. त्यामुळे ही ब्राह्मी भाजी रोज खाल्ल्याने शरीरातील शक्ती वाढते. ब्राह्मी भाजीचा रस खूप चांगला आहे. ब्राह्मीची भाजी विविध पोषक तत्वांनी समृद्ध असतात. त्यामुळे दररोज एक जेवढा शक्य आहे, तेवढा ब्राह्मीच्या भाजीच ज्यूस प्या.

वजन कमी

ब्राह्मीच्या भाजीमधील काही गुणधर्म वाढलेले वजन कमी करण्यासही मदत करते. यामुळे तुम्ही आहारामध्ये ब्राह्मीच्या भाजीचा समावेश करा. तसेच जर दररोज सकाळी ब्राह्मीच्या भाजीचा ज्यूस पिलातर वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. आपण सलाडमध्ये देखील ब्राह्मीच्या भाजीचा समावेश करायला हवा. ब्राह्मी ही जरी आयुर्वेदिक औषधी वनस्पती असली तरीही याचे सेवन करण्याच्या अगोदर नक्कीच डाॅक्टरांचा सल्ला घ्या. विशेष: आपण कुढल्या गोळ्यांचे सेवन करत असाल तर.

'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.