Breast Cancer : चुकीच्या आहारामुळे ‘स्तन कॅन्सर’चा वाढतो धोका; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
स्तनाचा कॅन्सर हा स्त्रियांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य आजार बनला आहे. शरीरातील जनुकीय (DNA) नुकसान किंवा आनुवंशिक उत्परिवर्तनामुळे (जेनेटिक म्यूटेशन) स्तनाचा कर्करोग विकसित होतो. चुकीचा आहार घेतल्याने, स्तन कॅन्सरचा धोका वाढतो. जाणून घ्या, कॅन्सर पासून बचावासाठी महिलांनी काय काळजी घ्यावी.
त्वचेच्या कर्करोगानंतर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast cancer) हा सर्वात सामान्य कर्करोग बनला आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2021 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अहवाल दिला आहे. की, स्तनाच्या कर्करोगाने फुफ्फुसाच्या कर्करोगाला मागे टाकले आहे. आणि आता महिलांमध्ये हा सर्वात सामान्य कर्करोग म्हणून समोर येत आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की, स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे, अनहेल्दी फूड (wrong diet) आहे. संशोधकांच्या मते, ज्या महिला शाकाहारातही चुकीचा आहार घेतात त्यांना स्तन कर्करोगाचा धोका जास्त असतो. Breast Cancer India च्या मते, दर 4 मिनिटांनी एका भारतीय महिलेला स्तन कॅन्सरचे निदान होते, तर दर 8 मिनिटांनी एका महिलेचा स्तन कॅन्सरने मृत्यू होतो. स्तन कॅन्सरच्या आनुवंशिक आणि कौटुंबिक इतिहासाव्यतिरिक्त, वयानुसार लठ्ठपणा व इतर अनेक घटक आहेत जे स्तन कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.
चुकीच्या आहाराने वाढतो धोका
तुमची जीवनशैली स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवण्यासाठी आणि रोखण्यासाठी कार्य करू शकते. अलीकडील संशोधनात असेही समोर आले आहे की, काही गोष्टींचे सेवन केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका सुमारे 20 टक्क्यांनी वाढतो. फ्रेंच वैद्यकशास्त्रानुसार, ज्या महिला शाकाहारातही चुकीचा आहार घेतात त्यांना स्तन कॅन्सरचा धोका जास्त असतो.
दिर्घायुष्यासाठी 6 सूपरफूड खा
न्यूट्रीशन 2022 लाईव्ह ऑनलाइन मध्ये सादर केलेल्या अभ्यासामध्ये निरोगी शाकाहारात, धान्य, फळे, भाज्या, शेंगदाणे आणि शेंगा यासारख्या पदार्थांचा समावेश आहे. त्याच वेळी, शाकहार-आधारित पदार्थांमध्ये पांढरे तांदूळ, मैदा आणि ब्रेड यांसारख्या शुद्ध धान्यांचा समावेश होतो.
अभ्यास काय सांगतो
या अभ्यासात अशा ६५ हजार महिलांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांचे रजोनिवृत्ती सुरू झाली होती. अभ्यासादरम्यान या महिलांचा जवळपास 20 वर्षे शोध घेण्यात आला. डॉक्टरांना असे आढळून आले की, ज्या महिलांनी त्यांच्या आहारात आरोग्यदायी पर्यायांचा समावेश केला आहे. त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका 14 टक्के कमी आहे. त्याच वेळी, या काळात शाकाहारात चुकीचे डाएट मध्ये सर्वोत्तम गोष्टी निवडणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका 20 टक्के जास्त असल्याचे आढळून आले. पॅरिस सकले युनिव्हर्सिटीच्या संशोधकाने सांगितले की, “या संशोधनात असे दिसून आले आहे की, शाकाहार आणि मांसाऐवजी, आपण योग्य शाकाहाराचे सेवन केल्यास, स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो.”
ब्रेस्ट कॅन्सरसाठी रिस्क फॅक्टर
WHO च्या मते, स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या काही घटकांमध्ये वाढते वय, लठ्ठपणा, जास्त मद्यपान, स्तनाच्या कर्करोगाचा अनुवांशिक इतिहास, रेडिएशन, रजोनिवृत्तीनंतरची शस्त्रक्रिया आणि तंबाखूचा वापर यांचा समावेश होतो.
स्तन कॅन्सर टाळण्यासाठी उपाय
याशिवाय, ग्लोबल हेल्थ एजन्सीनुसार, असे अनेक मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकता. या त्या पद्धती आहेत- स्तनपान, नियमित शारीरिक हालचाल, वजन नियंत्रित करणे, दारूचे सेवन न करणे, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन टाळणे, हार्मोन्सचा दीर्घकाळ वापर टाळणे, अतिरिक्त किरणोत्सर्ग(रेडिएशन) टाळणे.