India Corona Cases Update : आकडा वाढतोय, गेल्या चोवीस तासात देशभरात हजाराच्या घरात नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू
कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाचे संकट कमी झाल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी देशामध्ये बघायला मिळाले. यामुळे कोरोनाचे सर्व निर्बंध (Restrictions) जवळपास शिथिल देखील करण्यात आले. मात्र, आता परत एकदा देशामध्ये कोरोनाने डोकेवर काढल्याचे बघायला मिळते आहे. देशामध्ये काही दिवसांपूर्वी कोरोना रूग्णांची संख्या एकेरी आकडेवारीमध्ये होती.
मुंबई : कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाचे संकट कमी झाल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी देशामध्ये बघायला मिळाले. यामुळे कोरोनाचे सर्व निर्बंध (Restrictions) जवळपास शिथिल देखील करण्यात आले. मात्र, आता परत एकदा देशामध्ये कोरोनाने डोकेवर काढल्याचे बघायला मिळते आहे. देशामध्ये काही दिवसांपूर्वी कोरोना रूग्णांची संख्या एकेरी आकडेवारीमध्ये होती. मात्र, आता झपाट्याने कोरोनाचे (Corona) रूग्ण वाढताना दिसत आहेत. तसेच यादरम्यान कोरोनामुळे चार लोकांचा जीव देखील गेला आहे. यामुळे ही एक धोक्याची घंटा आहे.
परत एकदा भारतामध्ये कोरोनाने पाय पसरवले!
देशामध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध हटवण्यात आले. त्यानंतर लोकांनी मास्क वापरणे देखील बंद केले. गेल्या 24 तासांमध्ये देशात 975 नवीन रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात कोरोनाच्या 975 नवीन केसेस समोर आल्या आहेत. यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 4,30,40,947 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या देखील 11,366 वर पोहोचली आहे. तसेच यामध्ये 4 जणांचा मृत्यू देखील झाला आहे.
इथे पाहा ANI चे ट्विट
India reports 975 fresh #COVID19 cases, 796 recoveries and 4 deaths in the last 24 hours.
Active cases 11,366 pic.twitter.com/VGGWe7R8KG
— ANI (@ANI) April 16, 2022
आता मृतांची संख्या 5,21,747 झाली आहे. देशातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या बघता आपल्याला परत एकदा सर्तक होणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना विशेष काळजी घेत मास्क लावले पाहिजे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळाच. कारण अजूनही कोरोना गेला नाहीतर येणारी कोरोनाची आकडेवारी धोकादायक आहे. ओमिक्रॉनचा प्रभाव भारतामध्ये दिसला नाही. मात्र, इतर देशांमध्ये मध्यंतरी ओमिक्रॉनने चांगलाच धुमाकूळ घातला होता.
संबंधित बातम्या :
Spices : उन्हाळ्यात या मसाल्यांचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक, वाचा हे नेमके कोणते मसाले?
Skin Care Tips : ‘या’ विशिष्ट तेलाचा वापर करा, होईल उन्हाच्या झळांपासून त्वचेचं संरक्षण!