Health | टिफिनमध्ये फळे कट करून मुलांना देत आहात? मग हे दुष्परिणाम एकदा वाचाच!
व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचा मुलांच्या आहारामध्ये समावेश केला जातो. कारण यामुळे मुलांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये व्हिटॅमिन सी समृद्ध फळे देण्यावर पालकांचा अधिक भर असतो. जर ही फळे जास्त काळ प्रकाशात राहिल्यास त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी होऊ लागते. यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये व्हिटॅमिन सी समृद्ध कट केलेली फळे देणे टाळा.
मुंबई : पालक (Parents) आपल्या मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. आपल्या मुलाचे जेवण, त्याचा अभ्यास, त्याची झोप यासारख्या गोष्टींकडे ते खूप लक्ष देतात. यामध्ये मुलांचे जेवण हे सर्वांत महत्वाचे समजले जाते. बहुतांश पालक आपल्या मुलांना कोणते अन्न द्यायचे, जे चविष्ट तसेच आरोग्यदायीही (Healthy) आहे, याबाबत संभ्रमात असतात. काही वेळा अशा चुका होतात. ज्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याच वेळा आपण बघितले असेल की, पालक आपल्या मुलांना टिफिनमध्ये (Tiffin) काय निरोगी खाद्यपदार्थ द्यावेत, यासंदर्भात टेन्शनमध्ये असतात. पालक मुलाच्या टिफिनमध्ये चिरलेली फळे देतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते, या पद्धतीचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचा मुलांच्या आहारामध्ये समावेश केला जातो. कारण यामुळे मुलांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये व्हिटॅमिन सी समृद्ध फळे देण्यावर पालकांचा अधिक भर असतो. जर ही फळे जास्त काळ प्रकाशात राहिल्यास त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी होऊ लागते. यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये व्हिटॅमिन सी समृद्ध कट केलेली फळे देणे टाळा.
मीठ पाण्यात भिजवणे
पालक टिफिनमध्ये मिठाच्या पाण्यात भिजवलेली फळे मुलांना देतात, ती कापून मिठाच्या पाण्यात भिजवल्याने आरोग्यास हानी पोहोचते. मुलाला पोटदुखी किंवा अपचनाची तक्रार असू शकते. यामुळे कोणतेही फळ मिठाच्या पाण्यात भिजत ठेवून मुलांना अजिबात टिफिनमध्ये देऊ नका.
पपई
अशी अनेक फळे आहेत, जी कापल्यानंतर सडू लागतात आणि खराब होऊ लागतात. पालक मुलाचे पोट निरोगी ठेवण्यासाठी पपईसारखी फळे खायला देतात. टिफिनमध्ये ठेवल्यावर पपई वितळू लागते आणि नंतर खाल्ल्यास नुकसान होऊ शकते. तसेच उन्हाळ्याच्या हंगामामध्ये मुलांना पपई टिफिनमध्ये देणे टाळा.
कलिंगड आणि खरबूज
उन्हाळ्यात येणारी फळे पालक टिफिनमध्ये दिली जातात. यामुळे प्रामुख्याने कलिंगड आणि खरबूज देण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र, जर आपण बऱ्याच वेळ कापून ठेवलेले कलिंगड किंवा खरबूज खाल्ल्याने जुलाब लागण्याची शक्यता 100 टक्के असते. यामुळे मुलांना टिफिनमध्ये कलिंगड किंवा खरबूज देणे टाळाच.