Health Care Tips : वाचा उष्माघात होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय डाॅक्टरांकडूनच!

एप्रिल महिन्यामध्येच कडक उन्हाळामुळे शरीराची (Body) लाहीलाही सुरू आहे. सध्या तापमानाचा पारा चाळीशी ओलांडत आहे. तज्ज्ञांच्या मते, या हंगामामध्ये उष्माघाताचा धोका (Danger) अधिक वाढला आहे. फिजिशियन डॉ. राजकुमार गुप्ता म्हणाले की, तापमान 45 अंशांच्या पुढे गेल्याने शरीराला त्रास होतो.

Health Care Tips : वाचा उष्माघात होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय डाॅक्टरांकडूनच!
उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या टिप्स फाॅलो करा. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 10:06 AM

मुंबई : एप्रिल महिन्यामध्येच कडक उन्हाळामुळे शरीराची (Body) लाहीलाही सुरू आहे. सध्या तापमानाचा पारा चाळीशी ओलांडत आहे. तज्ज्ञांच्या मते, या हंगामामध्ये उष्माघाताचा धोका (Danger) अधिक वाढला आहे. फिजिशियन डॉ. राजकुमार गुप्ता म्हणाले की, तापमान 45 अंशांच्या पुढे गेल्याने शरीराला त्रास होतो. मग काय अशावेळी तर आपल्या घरातील एसी, पंखे आणि कुलरही काहीही कामाचे राहत नाही. थर्मोस्टॅटला त्रास देऊन शरीराची नैसर्गिक कूलिंग सिस्टम काम करणे थांबवते. त्यामुळे उष्माघाताचा (Heatstroke) धोका वाढतो. उष्माघाताची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

ही आहेत उष्माघाताची प्रमुख लक्षणे

उष्माघातामुळे आपले पाय दुखणे, जड होणे, डोके जड, चेहरा लाल होणे, मळमळ, उलट्या, जुलाब, वारंवार तहान लागणे, रक्तदाब वाढणे, अशक्तपणा, त्वचा कोरडी पडणे हे प्रामुख्याने लक्षणे आहेत. उष्माघात झाल्यास व्यक्तीला विशेष काळजी घ्यावी लागते. बरेच लोक यासर्व लक्षणाकडे सर्रास दुर्लक्ष करतात आणि हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातर आणि धोकादायकच आहे.

उष्माघात टाळण्यासाठी अशाप्रकारे घ्या खबरदारी

अधिकाधिक पाणी आणि फळांचे ज्यूस आहारामध्ये घ्या. जेणेकरून डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. उन्हाळ्यामध्ये संपूर्ण हात-पाय झाकतील अशी कपडे घ्याला. कैरीचे पन्ने, ताक, लस्सी इत्यादी थंड पदार्थ आहारात घेऊनच घराच्या बाहेर पडा. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या. पण उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. भरपूर हिरव्या भाज्या आणि फळे खा. ग्लुकोज सोबत ठेवा, जेणेकरुन गरज पडेल तेव्हा लगेच प्यावे.

त्वचेची अशाप्रकारे काळजी घ्या

उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेची अधिक काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी आपण उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीन लावा. चेहरा रूमालाने पूर्ण झाका. या हंगामामध्ये त्वचेवर टॅन होण्याचे देखील प्रमाण वाढते. मग अशावेळी आपण घरगुती फेसपॅक चेहऱ्याला लावायला हवेत. उन्हामध्ये जर आपल्याला दहा मिनिटे देखील घराच्या बाहेर पडायचे असेल तर आपण चेहऱ्याला सनस्क्रीन नक्कीच लावा.

संबंधित बातम्या : 

Health Care : रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दलचे फायदे!

Health : उन्हाळ्यात मधुमेहाच्या रूग्णांनी अशाप्रकारे काळजी घेणे आवश्यक, या टिप्स फाॅलो करा! 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.