या सुपरफूडचा आहारात समावेश करा, झटक्यात वाढेल हिमोग्लोबिनची पातळी…

रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर, डोळ्याभोवती काळे सर्कल निर्माण होणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. रोजच्या आहारात योग्य घटकांचा समावेश व व्यायाम केल्यास हिमोग्लोबिनची पातळी चमत्कारी पध्दतीने वाढू लागेल.

या सुपरफूडचा आहारात समावेश करा, झटक्यात वाढेल हिमोग्लोबिनची पातळी...
आरोग्य
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 8:55 AM

शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण (Hemoglobin level) हे आपल्या सुदृढ व निरोगी आरोग्याचे (Healthy health) पहिले लक्षण समजले जाते, शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होउन अनेक आजारांची शक्यता निर्माण होत असते. पोषक तत्वांच्या कमतरतेचा आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात. वेळीच योग्य आहाराचा समावेश नसल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हिमोग्लोबिनची पातळी म्हणजे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे लोहयुक्त प्रथिने आहे, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन (Oxygen) वाहून नेण्यास आणि चयापचय क्रिया राखण्यास मदत करते. शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असताना अॅनिमियाच्या समस्येला सामोरे जावे लागते. बदलत्या जीवनशैलीमुळे असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, ताण-तणाव आदी कारणांमुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होउ शकते. परंतु ती कमतरता वेळीच ओळखून योग्य आहार घेतल्यास, हिमोग्लोबिनची पातळी पुन्हा वाढू शकते.

संतुलित आहार आवश्‍यक

शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास लोह, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड असलेले पदार्थ खावेत. शरीरातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोह हे एक महत्त्वाचे खनिज आहे. लोहाने परिपूर्ण असलेल्या पदार्थांमध्ये हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, अंडी, चिकन, सीफूड, खजूर, बदाम, बीन्स, संपूर्ण धान्य, दही आणि बिया यांचा समावेश होतो. ‘व्हिटॅमिन सी’साठी संत्री, लिंबू, ब्रोकली, द्राक्षे, टोमॅटो आणि पपई इत्यादींचे सेवन फायदेशीर ठरू शकते. त्याच प्रमाणे पालक, शेंगदाणे, राजमा आदी पदार्थांचाही आपल्या आहारात समावेश करावा.

लोहयुक्त हर्बल चहा

लोह हे शरीरासाठी अत्यंत आवश्‍यक असते. आहारातून लोह पुरेशा प्रमाणात घेता येत नसेल तर अनेक ठिकाणी हर्बल चहादेखील उपलब्ध आहे. त्यांच्या सेवनातून शरीरातील लोहाची कमतरता भरुन काढता येते. सिंहपर्णी आणि लाल रास्पबेरी यांच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात लोह असते. त्यामध्ये जीवनसत्त्वे ए, सी, के, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे इतर पोषक घटक देखील असतात. या हर्बल चहाचे दररोज सेवन केल्याने लाल रक्तपेशींची निर्मित होण्यास मदत मिळून हिमोग्लोबिनदेखील वाढते.

तांब्याच्या भांड्यात पाणी प्यावे

तांब्याच्या भांड्यात जास्त वेळ ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. यातून लोहाची पातळी वाढते. तांब्याचा वापर प्राचीन आयुर्वेदीक काळापासून करण्यात येत आहे. तांब्याचे आपल्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने आपली पचनक्रियादेखील सुधारण्यास मदत होते. रात्रभर पाणी भरून ठेवल्यानंतर त्याचे सकाळी सेवन केल्यावर शरीरात अनेक सकारात्मक बदल होत असतात.

हे पदार्थ टाळा

काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ लोहाची पातळी कमी करु शकतात, किंवा शरीरात लोहाला विरोध करतात. अशा घटकांचे सेवन करणे टाळले पाहिजे. दूध आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे जास्त सेवन टाळले पाहिजे. चहा, सोडा, कॉफी किंवा अल्कोहोलचे अतिसेवन घातक ठरुन परिणामी हिमोग्लोबिनची पातळी कमी होण्यासाठी कारण ठरु शकते.

संबंधित बातम्या : 

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय माहितीय का?

Beauty care: चेहऱ्याच्या समस्या पटकन दूर करतं तमालपत्र! कसा करावा उपयोग? जाणून घ्या!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.