AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाल केळी कधी खाली आहेत का? फायदे कळल्यास रोज खाणार लाल केळी

आपण अगदी रोज एक तरी केळ खातो, तेही पिवळं. भूक लागली की आपण सहज उपलब्ध असणारी केळी खातो. केळ हे आरोग्यासाठी खूप चांगलं फळ आहे. डॉक्टरसुद्धा केळ खाण्याचा सल्ला देतात. लहान मुलांना आपण केळ खायला देतो. भारतात सगळ्यात जास्त केळीचं उत्पादन होतं. त्यामुळे प्रत्येक घरात केळी असतात. केळापासून वेगवेगळे पदार्थ केले जातात. सगळ्यात फेमस पदार्थ म्हणजे केळीचे चिप्स. पण तुम्ही कधी लाल केळी खाली आहेत. हो लाल केळी ही सुद्धा आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे.

लाल केळी कधी खाली आहेत का? फायदे कळल्यास रोज खाणार लाल केळी
लाल केळी
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 10:46 AM
Share

health मुंबईतील मांटुग्या भागात गेलो की तिथल्या भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात लाल केळी दिसून येतात. तामिल, तेलगू लोकं ही लाल केळी मोठ्या उत्साहाने विकत घेतात. आपण पिवळी केळी आवर्जून खातो. पण लाल केळीचा कधी विचार केला नाही. की त्याचे फायदे जाणून घेतले नाही. त्यामुळे आज आपण लाल केळीचे फायदे जाणून घेणार आहोत. ते कळल्यावर तुम्ही रोज लाल केळ खाणार.

लाल केळ खाण्याचे फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत

कोरोनाने संपूर्ण जगाला वेढीस आणलं आहे. या रोगापासून दूर राहण्याचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूर असणं गरजेचं आहे. लाल केळी नियमित खाल्ल्यामुळे तुमची रोग प्रतिकारकशक्ती वाढते. या केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि बी 6 उपलब्ध आहे. तसंच ही केळी खाल्ल्यामुळे तुमचा शरीरात पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यास मोठी मदत होते.

लाल केळी डोळ्यांसाठी फायदेशीर

लाल केळीमध्ये असलेले कॅरोटीनाईड्स त्यामुळे डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशी आहे. हाडे बळकट होतात लाल केळीमध्ये पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असल्याने लाल केळी नियमित खाल्ल्यामुळे हाडे बळकट होतात.

वजन नियंत्रित ठेवण्यास मदत

हो तुमचं वजन नियंत्रित राहत नाही आहे तर लाल केळीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. या केळ्यामध्ये फायबर्स आणि फॅट्स कमी असतात त्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

अशक्तपणा कमी करण्यास लाभदायक

लाल केळामध्ये अँटि ऑक्सिडंटमुळे लाल केळी खाल्ल्यामुळे हिमोग्लेबिन वाढण्यास चांगला फायदा होतो. त्यामुळे अँनिमियापासून तुमचा बचाव होतो.

लाल केळ म्हणजे इन्संट एनर्जी

भूक लागल्यावर आपण केळ खातो. कारण त्यातून आपल्याला एनर्जी मिळते. लाल केळ खाल्ल्यामुळे तुम्हाला इन्संट एनर्जी मिळते.

मन शांत होतं

लाल केळीमध्ये असलेले ट्रायटोफन हे मनाला शांत ठेवतं आणि तुमची बुद्धिमत्ता वाढविण्यास मदत करतं.

(लाल केळीचे अनेक फायदे आहेत पण ही केळी खाण्यापूर्वी प्रत्येकाने एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

मात्रा सूर्यकिरणांची: जीवनसत्वाचा स्त्रोत ते पोलिओवर गुणकारी, जाणून घ्या-लाभ

Hair Care | केस गळतात? ‘ही’ असू शकतात कारणं.. ‘या’ पदार्थाने गळू शकतात तुमचे केस!

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.