सकाळी उठल्या उठल्या मळमळ, डोकेदुखीचा त्रास? मॉर्निंग सिकनेसपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोपे उपाय

जर तुम्हाला सकाळी डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या होत असतील तर तुम्हाला मॉर्निंग सिकनेसची समस्या असू शकते. यापासून आराम मिळवण्यासाठी रोजच्या दिनचर्येत काही छोट्या-मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. तर मॉर्निंग सिकनेस पासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय ही प्रभावी ठरतात.

सकाळी उठल्या उठल्या मळमळ, डोकेदुखीचा त्रास? मॉर्निंग सिकनेसपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे सोपे उपाय
मॉर्निंग सिकनेस Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 3:28 PM

मॉर्निंग सिकनेस म्हणजे सकाळी उठल्यावर मळमळ, उलटी आणि डोकेदुखी यासारख्या समस्या. या समस्या गर्भधारणे दरम्यान महिलांमध्ये जास्त प्रमाणात उद्भवतात. परंतु काही वेळा त्या मागील कारणे भावनिक ताण, सतत प्रवास करणे, जास्त थकवा रात्रीचे जेवण उशिरा खाणे किंवा जड अन्न खाणे हे असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची दिनचर्या सुधारली पाहिजे. कारण सतत मळमळ आणि उलट्यांमुळे वजन कमी होऊ शकते आणि शरीरात इलेक्ट्रोलाईटची कमतरता देखील असू शकते. जे आरोग्यासाठी चांगले नाही. तुमची दिनचर्या सुधारण्या व्यतिरिक्त काही घरगुती उपाय तुम्हाला सकाळच्या या आजारापासून आराम देऊ शकता.

जर तुम्हाला सकाळी उलटी, मळमळ, डोकेदुखी होत असेल तर भरपूर पाणी प्या आणि चांगली झोप घ्या. याशिवाय जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणाच्या अर्धा तासानंतर पाणी प्या. मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा. तसेच सर्व पदार्थ एकाच वेळी खाण्याऐवजी काही तासांच्या अंतराने कमी प्रमाणात खा. याशिवाय मॉर्निंग सिकनेसच्या वेळी कोणत्या गोष्टी तुम्हाला आराम देऊ शकतात हे जाणून घेऊ.

आले आणि लिंबाचा चहा

जर तुम्हाला मॉर्निंग सिकनेसची समस्या असेल तर आले तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. एक कप पाण्यात ठेचलेले आले घालून उकळवा. गाळल्यानंतर त्यात थोडे लिंबू टाकून प्या. यामुळे काही वेळात उलट्या आणि मळमळल्यापासून आराम मिळेल. डोकेदुखी पासून आराम मिळवून देण्यासाठी ही हा प्रभावी उपाय आहे.

हे सुद्धा वाचा

या फळांचा वास घ्या

गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस होत असेल तर त्यावर आराम मिळवण्यासाठी लिंबू, संत्री, मोसंबी या फळांचा वास घेतल्याने आराम मिळतो. जर तुम्हाला मॉर्निंग सिकनेस असेल तर तुम्ही यापैकी फळ तुमच्या सोबत ठेवू शकता. याशिवाय लिंबूवर काळे मीठ टाकून खाल्ल्याने मॉर्निंग सिकनेस पासून आराम मिळतो.

बडीशेपने मिळेल आराम

बडीशेप पचनासाठी खूप चांगली असते. त्यामुळे जर तुम्हाला उलट्या किंवा मळमळ होत असेल तर बडीशेप उकळून त्याचे पाणी प्या किंवा तुम्ही बडीशेप चघळू शकता. यामुळेही आराम मिळतो आणि ॲसिडिटी, मळमळ यासारख्या समस्या होत नाहीत. बडीशेप अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असल्याने आरोग्यासाठी इतर फायदे देखील देते.

हिरवी वेलची

जर तुम्हाला सकाळी उलट्या आणि मळमळ होत असेल तर जास्त वेळ रिकाम्या पोटी न राहण्याचा प्रयत्न करा. याशिवाय तुम्ही हिरवी वेलची थोड्यावेळ दाताखाली ठेवून चावू शकता. यामुळे देखील आराम मिळतो.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.