सावधान…भारतामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 46 जणांचा मृत्यू, संकट अजून गेले नाही!
सध्या देशातील या रूग्णसंख्येसह देशातील एकूण रुग्णांची संख्या 4,31,38,393 वर पोहोचली आहे. त्यामध्ये 14,832 सक्रिय केसेसचा समावेश आहे. यामध्ये रिकव्हरी रेट 98.75 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 2.099 रिकव्हरी झाल्यामुळे एकूण संख्या 4,25.99,102 झाली आहे. आकडेवारीनुसार 46 मृत्यूमुळे भारतातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 5,24,459 वर पोहोचली आहे.
मुंबई : कोरोनाच्या (Corona) केसेस कमी झाल्यामुळे देशामधील कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, पुन्हा एकदा आता कोरोनाने डोकेवर काढल्याचे दिसते आहे. भारतात (India) गेल्या 24 तासामध्ये 2,022 नवीन कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 46 जणांचा जीव गेल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली. ही येणारी आकडेवारी धडकी भरवणारी असून परत एकदा सर्तक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध (Restrictions) हटवल्यामुळे लग्न समारंभ धुमधडाक्यात पार पडत आहेत. तसेच मास्क अजिबात वापरले जाते नाहीये. मुलांना शाळेंना सुट्ट्या असल्यामुळे फिरायल्या जाणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. यामुळे कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते आहे.
24 तासांमध्ये 46 जणांचा मृत्यू
सध्या देशातील या रूग्णसंख्येसह देशातील एकूण रुग्णांची संख्या 4,31,38,393 वर पोहोचली आहे. त्यामध्ये 14,832 सक्रिय केसेसचा समावेश आहे. यामध्ये रिकव्हरी रेट 98.75 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 2.099 रिकव्हरी झाल्यामुळे एकूण संख्या 4,25.99,102 झाली आहे. आकडेवारीनुसार 46 मृत्यूमुळे भारतातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 5,24,459 वर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,94,812 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. नुकताच आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे की, कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 192.38 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ
INSACOG ने भारतात कोरोना व्हायरसच्या BA.4 आणि BA.5 ओमिक्रॉन व्हायरल असल्याचे देखील सांगितले आहे आणि ही भारतीयांसाठी अत्यंत धोक्याची घंटा देखील आहे. एक केस तामिळनाडूमध्ये आढळली आहे तर दुसरी तेलंगणामध्ये यामुळे आता नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. BA.4 आणि BA.5 हे कोरोना व्हायरसचे अतिसंक्रमित प्रकार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना रूग्णांची संख्या ही झपाट्याने कमी झाली होती. यामुळे जवळपास सर्वच निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र, सध्याची कोरोनाच्या रूग्णांची येणारी आकडेवारी चिंता वाढवणारी ठरते आहे.