Healthy Heart : निरोगी हृदयासाठी आहारात ‘हे’ 6 पदार्थ समाविष्ट करा!

आपले हृदय हे महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. खराब जीवनशैली, तणाव आणि अस्वास्थ्यकर आहार यामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराची समस्या वाढली आहे. हृदयविकाराची समस्या दूर ठेवण्यासाठी आपण निरोगी आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. जे लोक नियमितपणे निरोगी अन्नाचे सेवन करतात त्यांना हृदयरोगाची शक्यता कमी असते.

Healthy Heart : निरोगी हृदयासाठी आहारात 'हे' 6 पदार्थ समाविष्ट करा!
हृदय
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 12:27 PM

मुंबई : आपले हृदय हे महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. खराब जीवनशैली, तणाव आणि अस्वास्थ्यकर आहार यामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराची समस्या वाढली आहे. हृदयविकाराची समस्या दूर ठेवण्यासाठी आपण निरोगी आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. जे लोक नियमितपणे निरोगी अन्नाचे सेवन करतात त्यांना हृदयरोगाची शक्यता कमी असते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम देखील महत्वपूर्ण भूमिका बजावते. (Include these foods in the diet for a healthy heart)

बिया

भोपळा, चिया आणि फ्लेक्ससीड सारख्या बियांमध्ये ओमेगा 3 तसेच फायबर भरपूर असते. हे दोन्ही निरोगी हृदयासाठी फायदेशीर आहेत. शिवाय या बिया आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. मात्र, या बिया भाजूनच खाणे आवश्यक आहे. भूक लागल्यावर मूठभर बिया खा आणि निरोगी आयुष्य जगा.

सुकामेवा

शेंगदाणे देखील हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. विशेषत: तुम्ही तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात अक्रोड आणि बदामांचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यामध्ये चरबी असते जी शरीरासाठी आवश्यक असते. ते खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात आणि तुमचे हृदय निरोगी ठेवतात.

मसाले

हळद, धणे, जिरे आणि दालचिनी हे काही मसाले आहेत. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे स्वयंपाक करताना हे मसाले वापरावेत.

लसूण

लसूण शरीरातील रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. जे हृदयाच्या निरोगी कार्यास मदत करते. लसूण मुख्यतः ग्रेव्ही आणि डाळ इत्यादी भारतीय पदार्थांमध्ये वापरला जातो. रिकाम्या पोटी कच्चे लसूण खाणे खूप फायदेशीर आहे. हे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

पालक

नेहमी हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर पोषक असतात आणि आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. पालक मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. ते रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. पालक जास्त शिजवल्याने त्याचे पोषणमूल्य कमी होतात. यामुळे पालक जास्त प्रमाणात शिजवू नका.

ओट्स

ओट्स आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. आपण जेवण आणि नाश्ता म्हणून ओट्सचा समावेश आपल्या आहारात करू शकता. ओट्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाला मदत करतात. याशिवाय ओट्समध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. हे शिजविणे सोपे आहे. ओट्स खाल्ल्यामुळे तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these foods in the diet for a healthy heart)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.