Health care : किडनी स्टोनच्या त्रासाने त्रस्त आहात, जाणून घ्या ‘या’ काळात कोणती फळे खावीत आणि कोणती टाळावीत!

लोकांची जीवनशैली इतकी खराब झाली आहे की, जवळपास सर्वांनाच किडनी स्टोनचा त्रास ( Stone problem) सहन करावा लागतो आहे. यादरम्यान पोटात दुखणे इतके तीव्र असते की कधीकधी ते सहन करणे कठीण होते. किडनी स्टोनची समस्या पित्ताशयात असल्यास शस्त्रक्रियाच करावी लागते. पित्ताशयातून स्टोन वेळीच काढला नाही तर यकृताला संसर्ग होऊ शकतो.

Health care : किडनी स्टोनच्या त्रासाने त्रस्त आहात, जाणून घ्या 'या' काळात कोणती फळे खावीत आणि कोणती टाळावीत!
किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी दररोजच्या आहारामध्ये या फळांचा समावेश करा. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 9:10 AM

मुंबई : लोकांची जीवनशैली इतकी खराब झाली आहे की, जवळपास सर्वांनाच किडनी स्टोनचा त्रास ( Stone problem) सहन करावा लागतो आहे. यादरम्यान पोटात दुखणे इतके तीव्र असते की कधीकधी ते सहन करणे कठीण होते. किडनी स्टोनची समस्या पित्ताशयात असल्यास शस्त्रक्रियाच करावी लागते. पित्ताशयातून स्टोन वेळीच काढला नाही तर यकृताला संसर्ग होऊ शकतो. या संसर्गामुळे कोलन कॅन्सर (Liver infection)  देखील होतो, त्यामुळे वेळेत शस्त्रक्रिया करणे चांगले. मात्र, औषधे आणि नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने छोटा किडनी स्टोन काढला जाऊ शकतो. किडनी स्टोनच्या समस्येदरम्यान आहाराची विशेष काळजी (Care) घ्यावी. अनेक वेळा लोक अशा गोष्टींचे सेवन करतात, ज्यामुळे हा त्रास आणखी वाढतो. या स्थितीत कोणती फळे खावीत आणि कोणती खाऊ नयेत. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

फळे : जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर, ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे ती फळे खा. किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीला डॉक्टर अधिक पाणी पिण्याचा सल्ला देतात. असे म्हटले जाते की जे लोक कमी पाणी पितात त्यांना अनेकदा किडनी स्टोनची समस्या उद्भवते. किडनी स्टोनची समस्या असल्यास तुम्ही टरबूज, खरबूज आणि नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता.

कॅल्शियमयुक्त फळे : किडनी स्टोनच्या वेळी किवी, काळी द्राक्षे आणि अंजीर यासारखी कॅल्शियमयुक्त फळे खावीत. असे म्हटले जाते की कॅल्शियममुळे किडनी स्टोन तयार होण्याचा धोका कमी होतो. एवढेच नाही तर तुम्ही इतर कॅल्शियम युक्त अन्नपदार्थही घेऊ शकता.

आंबट फळे: असे म्हटले जाते की लिंबूवर्गीय फळांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी किडनी स्टोनची समस्या दूर करण्यास मदत करते. एवढेच नाही तर त्यामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते. सायट्रिक ऍसिडसाठी संत्री, मोसमी, पेरू आणि द्राक्षे यांचे सेवन करावे. मुतखड्याची समस्या दूर करण्यासोबतच या फळांचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.

ही फळे अजिबात खाऊ नका!

किडनी स्टोनदरम्यान पचायला कठिण असलेली फळे अजिबात खाऊ नये. तज्ज्ञांच्या मते, डाळिंब, रताळे, आंबा आणि सुका मेवा खाणे टाळावे. असे म्हणतात की ही फळे खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या वाढू शकते. याशिवाय पॅकबंद आणि बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळाच.

संबंधित बातम्या : 

तुमच्या डोळ्याच्या खालीही डार्क सर्कल आहेत?, ‘हे’ घरगुती उपाय करा आणि डार्क सर्कल दूर पळवा!

असे मसाले जे आरोग्यासाठी ठरतील ‘सुपरफूड’… 60 टक्के आजारांचा धोका टळतो

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.