Health Care | मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणामध्ये या गोष्टींचा समावेश करा आणि निरोगी राहा!
मधुमेहींनी वेळेवर खाणेही खूप गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारे नाश्ता वगळू नका. दुपारचे जेवण वेळेवर करा. सकस आहारावर भर द्या. तज्ञांच्या मते, बरेच लोक दुपारच्या जेवणात काही पदार्थ खातात, ज्यामुळे साखरेची पातळी Sugar level झपाट्याने वाढते. दुपारच्या जेवणामध्ये नेमके काय घेतले पाहिजे. याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
मुंबई : मधुमेहाची (Diabetes) समस्या एकदा सुरू झाली की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते. जणू आपले शरीररच रोगाचे माहेर घर होते. मधुमेह झाल्यावर आपल्याला आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. विशेष: मधुमेहामध्ये आपण काय खातो आणि काय पितो हे सर्वात महत्वाचे आहे. कारण मधुमेहामध्ये नियमानुसारच खावे लागते. जर तुम्ही नियमांचे (Rules) पालन केले नाही तर साखर जास्त प्रमाणात वाढत राहील. चांगले घरगुती अन्न आणि योग्य आहार घेऊनच मधुमेहावर नियंत्रण (Control) ठेवता येते. नाही तर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत राहील. त्यामुळे कोणतेही अन्न खाण्यापूर्वी मधुमेहाचा रूग्णांनी चार वेळा नक्कीच विचार करायला हवा.
नाश्ता वगळू नका
मधुमेहींनी वेळेवर खाणेही खूप गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारे नाश्ता वगळू नका. दुपारचे जेवण वेळेवर करा. सकस आहारावर भर द्या. तज्ञांच्या मते, बरेच लोक दुपारच्या जेवणात काही पदार्थ खातात, ज्यामुळे साखरेची पातळी Sugar level झपाट्याने वाढते. दुपारच्या जेवणामध्ये नेमके काय घेतले पाहिजे. याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
भाकरी खा
मधुमेहींसाठी भातापेक्षा किंवा पोळीपेक्षा भाकरी खाणे अधिक फायदेशीर ठरते. भाकरी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, मधुमेहाच्या लोकांना आपले वजन नियंत्रणात ठेवणे देखील खूप महत्वाचे असते. भाकरी देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे मधुमेहाच्या रूग्णांनी आपल्या आहारामध्ये भाकरीचा समावेश करावा.
क्विनोआ
मधुमेहाच्या रूग्णांनी भात खाण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे. भाताऐवजी क्विनोआ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे क्विनोआमध्ये अजिबात कॅलरीज नसतात. दुपारच्या वेळी ज्वारी, ओट्स, नाचणी, मुग खाणे चांगले ठरते. मधुमेही रूग्णांनी हिरव्या मुगाचे अधिक सेवन करायला हवे. यासाठी मूग रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी दुपारी किंवा जेंव्हा तुम्हाला भूक लागेल, तेंव्हा मूगाचे सेवन करा.
सलाद
मधुमेहाच्या रूग्णांनी दुपारच्या जेवणामध्ये नेहमीच सलाद घेतले पाहिजे. काकडी, कांदा आणि टोमॅटो घालून सलाद तयार करा. सलादमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. सलाद आपला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. सोबतच पोट लवकर भरते. तुम्ही काकडी, टोमॅटो, कोबी किंवा पालक मिक्स करून देखील सलाद तयार करून शकता.