महिलांनो ‘हृदय’ जपा: डोकेदुखी ते थकवा; योग्यवेळी ओळखा हार्ट अॕटॕकची लक्षणे

पुरुषांबरोबरीने महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हृदयविकाराच्या सर्वसामान्य लक्षणांबद्दल आपणा सर्वांना माहिती असतेच. छातीत चमक, घबराट तसेच अस्वस्थता, श्वास घेण्यास अडचणी ही हृदयविकाराची प्राथमिक लक्षणे मानली जातात.

महिलांनो 'हृदय' जपा: डोकेदुखी ते थकवा; योग्यवेळी ओळखा हार्ट अॕटॕकची लक्षणे
women heart attack symptoms
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 5:57 PM

मुंबई: अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शारीरिक तंदुरुस्त असणाऱ्या व्यक्तीही हृदयविकाराचे लक्ष्य बनत आहे. हृदयातील रक्तभिसरणात बिघाडी झाल्याने मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका येतो. पुरुषांबरोबरीने महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हृदयविकाराच्या सामान्य लक्षणांबद्दल आपणा सर्वांना माहिती असतेच. छातीत चमक, घबराट तसेच अस्वस्थता, श्वास घेण्यास अडचणी ही हृदयविकाराची प्राथमिक लक्षणे मानली जातात.

काही महिलांमध्ये अशाप्रकारची लक्षणे जाणवू शकतात. मात्र, महिलांमध्ये छातीत चमक किंवा छातीत दुखण्याच्या व्यतिरिक्त अन्य लक्षणे असू शकतात. श्वसनास अडचणी, चक्कर येणे, घाम येणे आदी लक्षणे असू शकतात.

..तर, समजा हृदयविकाराचा झटका

1. महिला असो किंवा पुरुष दोघांसाठी हृदयविकाराच्या झटक्याचे प्राथमिक लक्षण डोकेदुखी किंवा अस्वस्थता ठरते.

2. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी थकवा देखील जाणवतो. सामान्य शारीरिक क्रिया किंवा हालचाली जिथे अधिक परिश्रमाची आवश्यकता नसते. मात्र, त्यावेळी थकव्याची भावना निर्माण होते.

3. महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर थरथरते तसेच श्वसनास अडथळा यांसारखी लक्षणे जाणवतात. मात्र, सरळ स्थितीत बसल्यास अशा लक्षणांचे प्रमाण कमी जाणवते.

4.हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही दिवस महिलांना झोपेची तीव्र समस्या जाणवते. तसेच महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी पोटदुखी किंवा पोटांत तीव्र दाब जाणवतो.

पथ्ये पाळा, हृदयविकाराचा झटका टाळा

-पोषक आहार घ्या आणि वजनावर नियंत्रण ठेवा. नियमित स्वरुपात व्यायाम अत्यंत महत्वाचा आहे. किमान प्रतिदिन 30 मिनिटे, आठवड्याला 5 दिवस किंवा 150 मिनिटांचा व्यायाम आवश्यक ठरतो.

-वर्षातून एकदा हृद्याची तपासणी करा. तुमच्या घरात यापूर्वीच कुणाला हृदयविकार असल्यास 5 वर्षातून एकदा सीटी कोरोनरी कॕल्शियम स्कोअरची तपासणी अवश्य करावी.

-धुम्रपान करणे आरोग्यासाठी अपायकारक आहे. स्वतःला तणावमुक्त ठेवा. मनमोकळ आयुष्य जगा

-पर्याप्त झोप घ्या, नियमित 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घ्या

संबंधित बातम्या:

Healthy foods | वय वर्ष 30 आहे आता… मग निरोगी राहण्यासाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश

Sperm Donor | ‘स्पर्म बँक’ बुडण्याची भीती? महामारीनंतर ‘विकी’ डोनर्स गेले कुठे?

Omicron Alert: औरंगाबादेत होम क्वारंटाइन बंद! मोठे उत्सव, लग्न टाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.