Health : जीवन शैलीतील बदल आणि तरुण वयातील ह्रदयविकाराची कारणे व उपाय जाणून घ्या डाॅक्टरांकडून!
चुकीची आहार पद्धती, बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि नियमितपणे व्यायाम न केल्यास तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक (Dangerous) आहे. यामुळे अनेक आजार आपल्या शरीराला घेरतात. मात्र, सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये माणूस सतत धावत आहे.
मुंबई : चुकीची आहार पद्धती, बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि नियमितपणे व्यायाम न केल्यास तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने हे धोकादायक (Dangerous) आहे. यामुळे अनेक आजार आपल्या शरीराला घेरतात. मात्र, सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये माणूस सतत धावत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली आहे. यामुळे कोणीही आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर (Body) होतो आहे. अगदी कमी वयामध्ये वेगवेगळे आजार होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यासर्व संदर्भात काही खास टिप्स आणि माहिती पुण्यातील प्रसिध्द डाॅक्टर ओंकार थोपटे हे देणार आहेत.
ह्रदयविकार
बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या ह्रदयावर होत आहे. अगोदर साधारण 50 नंतर ह्रदयाची समस्या निर्माण होत असतं. मात्र, खराब जीवनशैली आणि फास्टफूडमध्ये अगदी कमी वयामध्ये म्हणजे 25-30 वर्षांमध्ये देखील ह्रदयविकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. धोक्याची बाब म्हणजे 25 टक्के लोकांना वयाच्या 40 शीच्या आतमध्येच ह्रदयविकाराचा त्रास सुरू होतो आहे. कमी वयामध्ये ह्रदयविकार होण्याचे दोन महत्वाची कारणे आहेत. एक म्हणजे खराब जीवनशैली आणि दुसरे म्हणजे ताण. महिल्यांपेक्षा ही तरूण मुलांमध्ये ह्रदयविकार होण्याचे प्रमाण अधिक आहे.
ह्रदयविकार टाळण्यासाठी या गोष्टी करा!
ह्रदयविकार टाळण्यासाठी हेल्दी आहार घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या दररोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, कडधान्य यांचा समावेश करा. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. तेलकट जास्त खाणे टाळा. पोषक आहार घ्या आणि वजनावर नियंत्रण ठेवा.
व्यायाम महत्वाचा
नियमित स्वरुपात व्यायाम अत्यंत महत्वाचा आहे. किमान प्रतिदिन 30 मिनिटे, आठवड्याला 5 दिवस किंवा 150 मिनिटांचा व्यायाम आवश्यक ठरतो. बरेच लोक रात्री उशीरा झोपतात. यामुळे त्यांना सकाळी लवकर उठणे शक्य होत नाही. यासाठी दररोज रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठून व्यायाम करा. तसेच संध्याकाळी जेवन झाल्यानंतर लगेचच झोपू नका. तीन मिनिटे किमान चाला. यामुळे खाल्ले अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Tips : वजन कमी करायचे असेल तर ‘या’ पदार्थांचा ब्रेकफास्टमध्ये नक्की समावेश करा!
Health Care Tips : कोणते अन्न सर्वात आरोग्यदायी? तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या!