Mumbai Fish : मुंबईकरांना कॅन्सरचा धोका? बोबिंल, घोळ, माशात मायक्रोप्लॅस्टिकचे अंश

मुंबईकरांना मासे फार आवडतात. का आवडणार नाहीत, पापलेट, सुरमई, बोंबिल, जिताडा असं एक एक नाव घेत गेलं तरी तोंडाला चव सुटेल. शनिवार, रविवार तर मच्छि-मटणशिवाय जातच नाही. पण मुंबईकरांनो आता थोडं सावध (Careful) व्हावं लागणार आहे. कारण मुंबईकरांच्या डिशमध्ये जे काही आवडीचे मासे आहेत त्यातल्या काहींमध्ये प्लॅस्टिकचे (Plastic) मायक्रो अंश सापडलेले आहेत.

Mumbai Fish : मुंबईकरांना कॅन्सरचा धोका? बोबिंल, घोळ, माशात मायक्रोप्लॅस्टिकचे अंश
मुंबईकरांनो हे मासे खाणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा महत्वाची माहाती
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 11:13 AM

मुंबईकरांना मासे फार आवडतात. का आवडणार नाहीत, पापलेट, सुरमई, बोंबिल, जिताडा असं एक एक नाव घेत गेलं तरी तोंडाला चव सुटेल. शनिवार, रविवार तर मच्छि-मटणशिवाय जातच नाही. पण मुंबईकरांनो आता थोडं सावध (Careful) व्हावं लागणार आहे. कारण मुंबईकरांच्या डिशमध्ये जे काही आवडीचे मासे आहेत त्यातल्या काहींमध्ये प्लॅस्टिकचे (Plastic) मायक्रो अंश सापडलेले आहेत. केंद्रीय शैक्षणिक मत्स संस्था (Central institute of fisheries technology) म्हणजेच सीआयएफईच्या संशोधनात ही बाब उघड झालीय. एल्सव्हायर नावाच्या नावाजलेल्या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलंय.

कोणत्या मच्छीमध्ये मायक्रोप्लॅस्टिक?

हा प्रश्न फक्त अरबी समुद्रापुरताच मर्यादीत आहे असं नाही तर जगभरात तो गेल्या काही काळात निदर्शनास आलाय. ज्या ज्या महामेट्रोतलं सांडपाणी थेट समुद्रात सोडलं जातंय तिथ ही समस्या उदभवलेली आहे. मुंबईचा किनाराही त्याला अपवाद नाही. आपल्याकडे तर समुद्रात प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकण्याची जशी काय स्पर्धाच लागलेली असते. ओहोटीनंतर ते सगळं प्लॅस्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर येतं. पण त्यातलं काही समुद्राच्या तळाशीही जातं आणि त्यातलाच काही अंश समुद्राच्या तळाशी वावरणाऱ्या रहाणाऱ्या मच्छीमध्ये आढळून आलाय.

Fish

मुंबईकरांना चवीला आवडणारा स्वस्त आणि मस्त बोंबिल मासा हाही त्यापैकी एक. बॉम्बे डक असही त्याला म्हटलं जातं. त्याची खासियत एवढी भारी की तो इतर ठिकाणी कुठे भेटत नाही. पण त्याच बोबिंलवर आता प्लॅस्टिकचं संकट आहे. दुसरा मासा आहे जिताडा. तो आपल्याकडे चिखलातही सापडतो. तोही मुंबईकरांच्या आवडीचा. त्यातही प्लॅस्टिकचे अंश सापडलेले आहेत. त्यानंतर घोळ माशांचा नंबर लागतो. ह्या सर्व माशांच्या कल्ल्यात काळ्या निळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे अंश संशोधनात आढळून आलेत.

Fish

धोका काय?

प्लॅस्टिकचं एक तर विघटन होत नाही झालं तरी तो पोटात जातं मग ते जनावरांच्या असो की आता माशांच्या. मासे हा मेट्रो शहरातला एक महत्वाचा आहार आहे. त्यांच्यात चांगली जीवनसत्व आढळतात. पण ह्याच माशांच्या कल्ल्यांमध्ये प्लॅस्टिकचे अंश सापडत असल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढत आहे. हा धोका टाळायचा असेल तर समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचं आधी गाळणी होणं गरजेचं आहे तसच प्लॅस्टिकला तर समुद्रातच काय घराच्या आसपासच्या नाल्यातही सोडणे घातक ठरणारं आहे.

संबंधित बातम्या : 

अंकुरलेल्या लसणाचे आरोग्यदायी फायदे, शरीरतील हे गंभीर आजारही मुळापासून होतील नष्ट

Blood Sugar: तुमच्या रक्तात साखर असली तरीही तुम्ही अंडी खाऊ शकता, फक्त या 5 पद्धती जाणून घ्या

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.