Menstrual leave: मासिक पाळीतल्या असह्य वेदनांतून दिलासा देणारा निर्णय! पिरीयडदरम्यान 3 दिवस ‘विशेष सुट्टी’
दरम्यान, कायदा करण्याच्या तयारीत असलेल्या सरकारनं या निर्णयबाबत एक मसुदाही तयार केला आहे. लवकरच याबाबतचा दिलासादायक निर्णय घेतला जाईल, असं स्पेनच्या इक्विलिटी मंत्री इरिन मॉन्टेरो यांनी म्हटलंय. सुरुवातीला महिलांसाठी तीन दिवसांच्या सुट्टीची तरतूद करण्यात आली आहे. तर अधिक त्रास होणाऱ्या महिलांच्या सुट्टीत आणखी दोन दिवस वाढ करण्याचाही विचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलंय.
मासिक पाळी हा विषय स्त्रियांसाठी कळीचा असतो. बहुतांश स्त्रियांना (Women) मासिक पाळीदरम्यान, असह्य वेदाना होतात. या वेदनांमध्ये दैनंदिन काम करणंही मुश्किल होतं. काहींना पोटात दुखतं, काहींना जुलाब होतात, काहींना थंडी वाजते, काहींना प्रचंड थकवा येतो, काहींना अशक्त झाल्यासारखं वाटतं. प्रत्येकीचा मासिक पाळीचा (Menstruation) अनुभव वेगवेगळा असतो. पण प्रत्येकीच्या वेदना ही असह्य करणाऱ्या असतात. यामुळे काम करणाऱ्या स्त्रियांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे नोकरी करणाऱ्या असंख्या स्त्रियांना दिलासा मिळणार आहे. नोकरी (Job) करणाऱ्या स्त्रियांना मासिकपाळी दरम्यान सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एक कायदाही बनवण्यात आला आहे. हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे स्पेनमध्ये! यासाठी स्त्रियांना किमान तीन दिवसांची मासिक पाळीदरम्यान विशेष सुट्टीची तरतूद करण्यात येणार आहे.
चांगल्या निर्णयात अडथळे
खरंतर हा निर्णय प्रथमदर्शनी दिलासादायक जरी असला तरी तो घेणं स्पेनसाठी सोप्पं नसणार आहे. चांगल्या निर्णयाच्या आड काही जण आले असल्यानं हा निर्णय घेताना संघर्ष करावा लागत असल्याचं स्पेनमधील मंत्र्यांनी म्हटलंय.
काही कामगार संघटनांनी मासिक पाळीच्या विशेष सुट्टीला विरोध दर्शवलाय. समान न्यान नोकरदार वर्गास मिळायला हवा, या मागणीसाठी त्यांनी या निर्णयाविरोधात भूमिका घेतली असल्याचं स्पेनमधील मंत्र्यांनी म्हटलंय.
कायद्याची तयारी..
दरम्यान, कायदा करण्याच्या तयारीत असलेल्या सरकारनं या निर्णयबाबत एक मसुदाही तयार केला आहे. लवकरच याबाबतचा दिलासादायक निर्णय घेतला जाईल, असं स्पेनच्या इक्विलिटी मंत्री इरिन मॉन्टेरो यांनी म्हटलंय. सुरुवातीला महिलांसाठी तीन दिवसांच्या सुट्टीची तरतूद करण्यात आली आहे. तर अधिक त्रास होणाऱ्या महिलांच्या सुट्टीत आणखी दोन दिवस वाढ करण्याचाही विचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितलंय.
या कायद्याचा अंतिम मसुदा तयार असून लवकर हा कायदा आणण्यासाठी स्पेन सरकार काम करेल, असंही त्यांनी म्हटलंय. हा कायदा आणला गेला, तर त्याचा फायदा स्पेनमध्ये काम करणाऱ्या नोकरदार तरुणींसह महिलांना होईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.