Health Care : अचानक वजन कमी होणे हे लिव्हर सिरोसिसचे लक्षण असू शकते ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!
लिव्हर हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. पचनास मदत करण्याबरोबरच, ते अल्ब्युमिन आणि पित्त सारखे एन्झाईम देखील तयार करते. लिव्हरमधील एक छोटासा दोषही अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतो. लिव्हर सिरोसिस हा यापैकी एक आजार आहे.
मुंबई : लिव्हर हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. पचनास मदत करण्याबरोबरच, ते अल्ब्युमिन आणि पित्त सारखे एन्झाईम देखील तयार करते. लिव्हरमधील एक छोटासा दोषही अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतो. लिव्हर सिरोसिस हा यापैकी एक आजार आहे. ज्यामध्ये यकृत हळूहळू खराब होऊ लागते. हा आजार सायलेंट किलरसारखा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सुरुवातीला ते सापडत नाही आणि नंतर ते जीवघेणे ठरते. जर एखाद्या व्यक्तीचे वजन अचानक कमी होत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. सर गंगाराम हॉस्पिटल इंस्टीट्यूट ऑफ लिव्हर गैस्ट्रो विभागचे चेअरमॅन प्रोफेसर डॉ. अनिल अरोड़ा सांगतात की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे लिव्हर खराब होते. (Liver Damage) तेव्हा ते स्वत: दुरुस्त करू लागते. या प्रक्रियेदरम्यान एक टिशू तयार होतो. याला स्कार टिशू म्हणतात.
हे टिशू लिव्हरमधील रक्तप्रवाह कमी करू लागतात आणि यामुळे लिव्हरची काम करण्याची क्षमताही कमी होते. या टिशू जितक्या जास्त वाढतात तितकी लिव्हरची क्षमता कमी होऊ लागते. कधीकधी लिव्हर पूर्णपणे काम करणे थांबवते. डॉक्टरांच्या मते या आजाराची लक्षणे लगेच कळत नाहीत. मात्र, जे लोक जास्त मद्यपान करतात किंवा लठ्ठपणा आणि मधुमेह असतो. त्यांना हे असण्याची शक्यता जास्त असते. मात्र, वेळीच लक्षणे ओळखून लिव्हर सिरोसिसवर नियंत्रण मिळवता येते.
ही प्रमुख लक्षणे
डॉ.अनिल यांच्या म्हणण्यानुसार, लिव्हर सिरोसिसचा त्रास असलेल्या रुग्णांना भूक कमी लागते. त्याला थकवा जाणवतो. त्यामुळे आजाराने त्रस्त रुग्णाचे वजनही कमी होऊ लागते. याशिवाय, जर तुम्हाला किरकोळ दुखापत झाली आणि जास्त रक्तस्त्राव सुरू झाला तर हे देखील सिरोसिसचे लक्षण असू शकते.
या गोष्टी लक्षात ठेवा
डॉक्टरांच्या मते, ज्या लोकांना लिव्हर सिरोसिसची लक्षणे जाणवतात. त्यांनी मद्यपान ताबडतोब बंद करा. तुमच्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा समावेश करा. आहारात कमी चरबीयुक्त पदार्थ घ्या. कारण त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे हा आजार आणखी गंभीर होतो.
संबंधित बातम्या :
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Sudden weight loss can be a sign of liver cirrhosis)