रक्तदाब व मधुमेहींसाठी हे पदार्थ वरदानापेक्षा कमी नाहीत

अनेक जण उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या समस्येने त्रस्त असतात. बरेच उपचार करुनदेखील रक्तदाब व मधुमेह कंट्रोल होत नसल्याने अनेक लोक निराश होतात. परंतु या दोघांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या घरातीलच काही घटक उत्तम व गुणकारी ठरु शकतात. उच्च रक्तदाब व मधुमेह असलेल्यांना हे पदार्थ वरदानापेक्षा कमी नाहीत.

रक्तदाब व मधुमेहींसाठी हे पदार्थ वरदानापेक्षा कमी नाहीत
blood pressure and diabetesImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 10:58 AM

बदलती जीवनशैली, फास्टफूडचा अतिरेक, सकस आहार व व्यायामाचा अभाव, कामाचा व्याप, तणावपूर्ण जीवन आदी विविध कारणांमुळे भारतासारख्या देशात उच्च रक्तदाब (blood pressure)मधुमेहाच्या (diabetes) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांपासून ही वाढ सातंत्याने कायम राहिली आहे. प्रत्येक दुसरा व्यक्ती हा रक्तदाब किंवा मधुमेहाने त्रस्त दिसून येत आहे. हे दोन्ही आजार नियंत्रणात आणण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात, विविध महागडे उपचार घेतात. परंतु तरीदेखील त्यांना यावर नियंत्रण मिळवता येत नाही. परिणामी यातून रुग्ण हताश होतो. मग जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोणदेखील बदलत जातो. अशा वेळी तुम्ही काही घरगुती उपाय व काही पदार्थांचा आपल्या रोजच्या आहारात (diet) समावेश करुन या दोन्ही समस्यांपासून सुटका करु शकतात. या लेखात याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

जांभूळ

हे उन्हाळी फळ आहे. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. खायला अतिशय रुचकर लागते. शिवाय यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. जांभळात असलेल्या गुणधर्मामुळे यातून उच्च रक्तदाब व रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होत असते. याशिवाय स्ट्रोक येणे, ह्रदयासंबंधित अनेक आजार नियंत्रणात करण्याची क्षमता जांभळात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्यांनी आपल्या आहारात जांभळाचा समावेश करावा.

बीट

गडद लाल रंगाचे बीट आपणा सर्वांनाच माहिती आहे. बाराही महिने बीट बाजारात उपलब्ध असते. लोक याची भाजी करतात किंवा सलादमध्येही याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. बीट हे शरीरासाठी अतिशय महत्वपूर्ण असते. या फोलेटदेखील असते. शिवाय यातील नाइट्रिक ऑक्साइड उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करीत असतो. यात प्राकृतिक पध्दतीची साखर असते. त्यामुळे याच्या सेवनाने रक्तातील साखर वाढत नाही. मधुमेहींनी याचे सेवन करणे उत्तम असते.

लसूण

रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांसाठी लसणाचे अतिशय फायदे असतात. लसणामुळे शरीरातील नसा मोकळ्या होतात. रक्तप्रवाह सुरळीत होत असतो. शिवाय लसूण हा रक्तदाब व मधुमेह नियंत्रणाचे उत्तम कार्य करीत असतो. टाइप 2 मधुमेह असणार्यांसाठी लसूण अतिशय प्रभावी मानला जातो.

भोपळा

भोपळा व त्याच्या बिया मधुमेहींसाठी अतिशय फायदेशीर असतात. भोपळ्याच्या बियांचा तुम्ही रोजच्या आहारात समावेश करु शकतात. भोपळ्यामुळे मोठ्या प्रमाणात फायबर असतात. या शिवाय त्यातील झिंक व मिनरल्समुळे उच्च रक्तदाबही नियंत्रणात येत असतो. त्यामुळे रक्तदाब व मधुमेहींनी भोपळ्यासह त्याच्या बियांचा आहारात समावेश करावा.

हेही वाचा:

Glowing Skin: नितळ, चमकदार त्वचेसाठी सकाळी उठल्यावर ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स प्या

खरबूज हे फळ खूप चवदार आणि आरोग्यासाठीही फायदेशीर, आहारात नक्की समावेश करा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.