नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच… दह्यासोबत हे 5 पदार्थ खात असाल तर सावध व्हा, नाही तर…
दही आणि तूप यांच्या फायद्यांबद्दल आणि त्यांचे एकत्र सेवन केल्याने होणारे धोके यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आयुर्वेदानुसार, दही आणि तूप यांची प्रकृती वेगळी असल्याने ती एकत्र खाणे टाळावे. दह्यासोबत काही विशिष्ट पदार्थ खाणे देखील हानिकारक असू शकते. आपण दही आणि तूप एकत्र खाण्याचे नुकसान आणि दह्यासोबत काय खाऊ नये याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
माणसाला आरोग्य उत्तम राखायचं असेल तर दूध आणि दूधाचे पदार्थ खाल्ले पाहिजे. डॉक्टरही दूध आणि दुधाचे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. दुपारच्या जेवणात तर दही खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण दही पचण्यास चांगली असते. तूप देखील शरीराला फायदेशीर असते. पण दोन्ही पदार्थ कधीच एकत्र खाऊ नये. नाही तर गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. दह्यासोबत आणखीही काही पदार्थ चुकूनही खायचे नसतात. ते पदार्थ दह्यासोबत खाल्ल्यास जीवावर बेतू शकतं. त्यामुळे कोणते पदार्थ दह्यासोबत खायचे आणि कोणते नाही ते आज आपण पाहू.
दह्याचे पदार्थ :
दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. शरीरासाठी ते उपयुक्त असतात. तसेच, दही खाल्ल्याने पाचनास मदत करणारे एंझाइम्स मिळतात. तज्ज्ञांच्या मते, रोज 1 वाटी दही खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते. दहीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, कारण यामध्ये कॅल्शियम असत. ते हाडे आणि दातांसाठी फायदेशीर असते. दही शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
तूपाचे फायदे:
दररोज तूप खाल्ल्याने हृदयाच्या रोगांपासून बचाव होऊ शकतो. तूप सेवनामुळे शरीर निरोगी राहते. 1 चमचा तूप खाल्ल्याने रोगांचा प्रतिकार करण्यास मदत मिळते. परंतु, दही आणि तूप एकत्र खाल्ले जाऊ शकतात का? त्यामुळे काय फायदा होतो? किंवा नुकसान होते याचीच आज माहिती घेणार आहोत.
दही आणि तूप एकत्र का खाऊ नये?
आयुर्वेदानुसार दही आणि तूप एकत्र खाऊ नये. दोन्ही दूधाचे पदार्थ असले तरी त्यांची प्रकृती वेगळी असते. दही शरीराला थंडपणा देतो, तर तूप शरीराला उष्णता प्रदान करते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा लोक दहीसह तूपाचा पराठा खातात, तेव्हा त्यांना पोट फुगणे किंवा पचनाशी संबंधित समस्या येऊ शकतात. कारण पोटामध्ये दोन्ही पदार्थ एकत्र पचवायला त्रास होतो.
दही आणि तूप एकत्र खाल्ल्याचे नुकसान :
पचनातील गडबड, कोलेस्ट्रोल वाढणे, हृदय रोग, त्वचेवरील अलर्जी, दहीसह काय खाऊ नये?, दह्यासोबत आंबट फळे म्हणजे लिंबू आणि संत्रा खाणे टाळावे., दह्यासोबत टमाटर खाणेही हानिकारक असते., आयुर्वेदानुसार दही आणि टरबूज एकत्र खाणे टाळावे., दह्याबरोबर पनीर आणि कारलं एकत्र खाणेही योग्य नाही.