तालिबान्यांसमोर अफगान सरकार झुकले, सत्ता सोपवणार?; राष्ट्रपती भवनात खलबते सुरू

तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलला वेढा घातला आहे. अफगान सरकारच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला पृष्टीही दिली आहे. (Taliban Kabul Attack)

तालिबान्यांसमोर अफगान सरकार झुकले, सत्ता सोपवणार?; राष्ट्रपती भवनात खलबते सुरू
taliban
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 4:02 PM

काबुल: तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलला वेढा घातला आहे. अफगान सरकारच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला पृष्टीही दिली आहे. त्यामुळे तालिबान्यांच्या हाती सत्ता सोपवण्यावर अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनात चर्चा सुरू असून कोणत्याही क्षणी हे सत्तेचं सत्तांतर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Afghanistan will have ‘peaceful transfer’ of power, says minister)

taliban

taliban

तालिबानने सत्ता परिवर्तनाची मागणी केली आहे. त्यावर अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्जकवाल यांनी शिक्कामोर्तब केला आहे. काबुलवर हल्ला होणार नाही. सत्ता परिवर्तन शांततेने होईल. काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी सेक्युरिटी फोर्सवर आहे, असं मिर्जकवाल यांनी म्हटल्याचं टोलो न्यूजच्या वृत्तात म्हटलं आहे.

taliban

taliban

न्यूज एजन्सी एपीच्या नुसार तालिबानचे दूत अफगानच्या राष्ट्रपती भवनात जात आहेत. राष्ट्रपती भवनात जाऊन ते सत्ता परिवर्तनावर चर्चा करतील.

taliban

taliban

तालिबानला ताकदीच्या बळावर काबुलवर सत्ता बदल घडवून आणायचा नाही. आम्हाला सत्तांतर हवं आहे. सत्ता परिवर्तन शांततेत होत असेल तर आमच्याकडून कोणतीही जीवित वा वित्तहानी होणार नाही, असं तालिबानने म्हटलं आहे.

taliban

taliban

दरम्यान, सीमेवर कोणत्याही प्रकारचा संघर्ष सुरू नाही. तालिबानच्या अतिरेक्यांनी कलाकान, काराबाग आणि पगमान जिल्ह्यात घुसखोरी केली आहे. त्यामुळे सरकारचं टेन्शन वाढलं आहे. त्याचा परिणाम म्हणून सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दुपारीच घरी पाठवण्यात आलं आहे.

taliban

taliban

तालिबानने त्यांच्या समर्थकांना काबूलच्या चहूबाजूनं थांबण्यास सांगितलं आहे. काबूलवर ‘बळाचा वापर करुन’ काबीज करु नये, असे तालिबानकडून त्यांच्या समर्थकांना आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी, रविवारी सकाळी सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना अचानक घरी पाठवण्यात आल्याची बातमी आली होती. लष्कराची हेलिकॉप्टर आकाशात फिरू लागली असल्याचंही निदर्शनास आलं. दरम्यान, तालिबानने जलालाबाद ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी अमेरिकेची हेलिकॉप्टर रविवारी येथील अमेरिकन दूतावासावर उतरली आहेत. (Afghanistan will have ‘peaceful transfer’ of power, says minister )

संबंधित बातम्या:

Taliban in Kabul: तालिबान्यांची काबूलमध्ये धडक, अफगाणिस्तानच्या राजधानीला वेढा, नेमकं काय घडतंय?

अफगाणिस्तानमध्ये तांडव, 10 प्रमुख शहरांवर कब्जा, तालिबान पुन्हा सत्तेत येणार?

मोदी म्हणतात, भारत-पाक फाळणीचा स्मृती दिन साजरा करणार; पटोले म्हणातात, हा तर देशांतर्गत फाळणीचा डाव

(Afghanistan will have ‘peaceful transfer’ of power, says minister )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.