पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मिळाला RRR चा मंत्र; टीव्ही9 नेटवर्कचे MD-CEO बरुण दास यांचं प्रतिपादन

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले. मोदींनी न्यूज9 ग्लोबल समिटचं आमंत्रण स्वीकारून संबोधित केल्याबद्दल बरूण दास यांनी मोदींचे आभार मानले. मोदींनी व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. आज त्यांच्या भाषणातून पुन्हा एकदा शांतता आणि प्रगतिचं व्हिजन मिळेल असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मिळाला RRR चा मंत्र; टीव्ही9 नेटवर्कचे MD-CEO बरुण दास यांचं प्रतिपादन
Tv9 Network MD CEO Barun DasImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 9:36 PM

जगात शांतता आणि विकास नांदावा ही भूमिका घेऊन जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महत्त्वाचे जागतिक नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तीमत्त्व RRR सारखं आहे. म्हणजे रिलेशनशीप, रिस्पेक्ट आणि रिस्पॉन्सिबिलिटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात ओळखले जातात, असे गौरवोद्गार टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी काढले. जर्मनीच्या प्रसिद्ध स्टटगार्ट स्टेडियममध्ये News9 ग्लोबल समिट सुरू आहे. आज या समिटचा दुसरा दिवस आहे. यावेळी बरुण दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही आजच्या संमेलनात मुख्य भाषण होणार आहे.

ग्लोबल समिटच्या या उत्सवात सहभागी झालेल्या वक्त्यांनी भारत आणि जर्मनीच्या द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकट ठेवण्यासाठी जी भूमिका मांडली, जे विचार व्यक्त केले, ते येणारं भविष्य अत्यंत चांगलं करणारे आहेत. या विचारांवर चालल्यास आपण जगात नव्या उंचीवर जाऊ शकतो, असं बरुण दास म्हणाले. यावेळी त्यांनी नवी दिल्लीत पार पडलेल्या टीव्ही9 व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला. त्यावेळी आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वातून तीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या म्हणजे, सुशासन, बहुमुखी होणे आणि देशाचा मूड बदलणे, असं बरुण दास यांनी सांगितलं.

मोदींकडून शिकवण मिळाली

काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तीमत्त्वातून आम्ही या गोष्टी शिकलो. पण आज मोदी यांच्या पर्सनॅलिटीत RRRची चमक दिसून येते. RRR हे एका लोकप्रिय चित्रपटाचं टायटल आहे. या सिनेमाला गेल्या वर्षी बेस्ट ओरिजिनल गाण्यासाठीचं ऑस्कर मिळालं. पण माझ्यासाठी हे त्याहूनही मोठं आहे. जगाला शांती आणि सौहार्दपूर्ण भविष्य देणारा RRR हा असा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, असं बरुण दास यांनी सांगितलं.

RRR म्हणजे काय?

RRRची नव्याने व्याख्या करण्याची मी संधी घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वातूनच मी हे शिकलो आहे. यातील पहिला R म्हणजे रिलेशनशीप म्हणजे संबंध. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील कोणत्याही देशाशी उत्तम संबंध प्रस्थापित करण्यास सक्षम आहेत. जगही त्यांच्या मैत्रीसाठी आतूर असतं. मोदींनी मॉस्कोच्या कीवपासून इस्रायलच्या पॅलेस्टाईनपर्यंत आपले उत्तम संबंध प्रस्थापित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या समोरच्या आव्हानांमध्ये मानवता महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी नेहमीच शांतीचा संदेश दिला आहे, असंही बरुण दास यांनी सांगितलं.

दुसऱ्या Rचा अर्थ आहे, रिस्पेक्ट. म्हणजे सन्मान. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा कुणाशी संबंध प्रस्थापित करतात तेव्हा सन्माला अधिक महत्त्व देतात. सामूहिक प्रयत्न ही मानवतेची सर्वात मोठी ताकद आहे, कोणताही वाद किंवा विवाद नाही, असं मोदी नेहमी सांगतात. संपूर्ण जगाच्या संदर्भाने त्यांचे हे विचार येतात. हा काळ युद्धाचा नव्हे तर शांतता, सौहार्द आणि प्रगतीचा आहे, यावर मोदींनी नेहमीच जोर दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्यानंतर त्यांनी तिसऱ्या Rचा अर्थ सांगितला. या Rचा अर्थ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व असा आहे. मोदींच्या नेतृत्वातच तिसरा मंत्र दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परराष्ट्र धोरणात मानवतेची बाजू उचलून धरतात. त्यांनी नेहमीच मानवी मूल्यांची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाने जगाला व्हिजन दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.