AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत मार्क कार्नी? राजकारणाचा शून्य अनुभव तरीही कॅनडासाठी खास का? जाणून घ्या

लिबरल पक्षाचे नवे नेते म्हणून मार्क कार्नी यांची निवड करण्यात आली आहे. ते कॅनडाचे नवे पंतप्रधान होतील. कार्नी यांची मात्र राजकारणी म्हणून ओळख नाही. अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. हार्वर्ड आणि ऑक्सफर्ड सारख्या जगातील अव्वल विद्यापीठांमधून त्यांनी शिक्षण घेतले आहे. मार्क कार्नी यांच्याविषयी जाणून घेऊया.

कोण आहेत मार्क कार्नी? राजकारणाचा शून्य अनुभव तरीही कॅनडासाठी खास का? जाणून घ्या
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Mar 10, 2025 | 3:35 PM
Share

लिबरल पक्षाचे नवे नेते म्हणून मार्क कार्नी यांची निवड करण्यात आली आहे. ते कॅनडाचे नवे पंतप्रधान होतील. कार्नी यांची मात्र राजकारणी म्हणून ओळख नाही. अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. हार्वर्ड आणि ऑक्सफर्ड सारख्या जगातील अव्वल विद्यापीठांमधून त्यांनी शिक्षण घेतले आहे. मार्क कार्नी यांच्याविषयी जाणून घेऊया.

लिबरल पक्ष, मार्क कार्नी, जस्टिन ट्रुडो, Next Prime Minister Of Canada, Mark Carney

कॅनडाला नवे पंतप्रधान मिळणार आहेत. कॅनडा आणि इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर असलेले मार्क कार्नी जस्टिन ट्रुडो यांची जागा घेतील. कार्नी यांची रविवारी लिबरल पक्षाच्या नव्या नेतेपदी निवड करण्यात आली. कार्नी यांच्याविषयी एक गोष्टी जी सर्वांना आश्चर्यचकित करत आहे, ती म्हणजे त्यांना राजकारणाचा कोणताही अनुभव नाही.

मार्क कार्नी यांची अर्थव्यवस्थेच्या दुनियेत कारकीर्द चमकदार राहिली आहे. अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांच्या प्रतिष्ठेमुळे त्यांना लिबरल पक्षाचे नेते होण्यास मदत झाली आहे. कार्नी येत्या काही दिवसांत पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

मार्क कार्नी हे 59 वर्षांचे असून त्यांचा जन्म 1965 मध्ये कॅनडातील नॉर्थवेस्ट टेरिटोरीजमधील फोर्ट स्मिथ येथे झाला. एडमॉन्टनमध्ये वाढलेले कार्नी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले आणि हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी युनायटेड किंग्डममधून पदव्युत्तर पदवी आणि त्यानंतर 1995 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. कार्नी शालेय जीवनात आईस हॉकीही खेळत असे.

बँक गव्हर्नर अशी ओळख मार्क कार्नी यांनी जगातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये दीर्घकाळ काम केले आहे. 2008 मध्ये कार्नी यांची बँक ऑफ कॅनडाच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली. या पदावर असताना त्यांना जगभर ओळख मिळाली. 2008 च्या आर्थिक संकटातून कॅनडाला सावरण्यात कार्नी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2010 मध्ये टाईम मासिकाने त्यांना जगातील 25 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिले होते. पुढच्याच वर्षी म्हणजे 2011 मध्ये रीडर्स डायजेस्ट कॅनडाने त्यांना ‘मोस्ट ट्रस्टेड कॅनेडियन’ आणि 2012 मध्ये युरोमनी मासिकाने सेंट्रल बँक गव्हर्नर ऑफ द इयर म्हणून घोषित केले.

2013 मध्ये कार्नी बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी ब्रिटनमध्ये आले होते. 300 वर्षांच्या इतिहासात या संस्थेचे प्रमुख पद भूषविणारे ते पहिले बिगर ब्रिटीश नागरिक ठरले. 2020 पर्यंत ते या पदावर होते. 2020 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान कृती आणि वित्त विषयक विशेष दूत म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कार्नी यांनी गोल्डमन सॅक्समध्येही काम केले आहे. कॅनडाच्या लिबरल पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी इतर सर्व पदांचा राजीनामा दिला.

1994 मध्ये विवाहित, चार मुले मार्क कार्नी यांनी 1994 मध्ये ब्रिटनच्या डायना फॉक्ससोबत लग्न केले होते. फॉक्स आणि कार्नी या विकसनशील देशांतील तज्ज्ञ ब्रिटिश अर्थतज्ज्ञाची ऑक्सफर्ड विद्यापीठात भेट झाली. फॉक्सकडे ब्रिटन आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे. गेल्या काही वर्षांपासून ती आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिकेत काम करत आहे. या दाम्पत्याला चार मुले आहेत. फॉक्स आणि कार्नी यांना चार मुले आहेत, जी शिक्षण घेत आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.