दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला गुलाब पाणी लावण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा अधिक !

एक उत्कृष्ट आणि नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून गुलाबाचे पाणी वापरले जाते. अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते.

दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला गुलाब पाणी लावण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा अधिक !
गुलाब पाणी
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 6:18 PM

मुंबई : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण वेगवेगळ्या क्रीम, पावडर, साबण, फेसवाॅश, साैंदर्य उत्पादने देखील वापरतो. मात्र, आपल्याला पाहिजे तशी त्वचा मिळतच नाही. एक उत्कृष्ट आणि नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून गुलाबाचे पाणी वापरले जाते. अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते. जर आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर संपूर्ण चेहऱ्याला गुलाब पाणी लावले तर आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. (Applying rose water on the face is extremely beneficial)

गुलाब पाणी चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याचा सुरकुत्यापासून बचाव करते. गुलाबाचे पाणी उत्कृष्ट क्लीन्सर, मेकअप रिमूव्हर म्हणून देखील काम करते. ते चेहऱ्यावरील धूळयुक्त मातीचे कण काढून टाकते. दिवसभर आपण आॅफिसच्या कामानिमित्त किंवा घरातील कामानिमित्त आपण घराच्या बाहेर असतो. यामुळे आपली त्वचा खराब होते आणि त्वचेवर टॅन साचतो. जर आपण दररोज रात्री कापसाच्या सहायाने चेहऱ्यावर गुलाब पाणी लावले तर दिवसभर बसलेली धुळ आणि चेहऱ्यावरील आॅईल कमी होण्यास नक्की मदत होईल.

गुलाब पाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतील धुळ माती निघून जाते. मात्र त्यासोबतच तुमच्या त्वचेतील ओलावादेखील कायम राहतो. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो. यासाठीच उन्हाळ्यात त्वचा फ्रेश दिसावी असं वाटत असेल तर घराबाहेर पडताना एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरा आणि सोबत ठेवा. थकवा जाणवू लागल्यास चेहऱ्यावर शिंपडण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे तुम्ही लगेच फ्रेश दिसू शकाल.

आपल्याला घरच्या घरी बनवलेले गुलाबाचे पाणी स्किन टोनर म्हणून वापरायचे असेल, तर 100 मिली स्प्रे असलेल्या बाटलीत 85 मिली गुलाब पाणी घ्या. त्यात 8 ते 10 थेंब लव्हेंडर तेल आणि ग्लिसरीन घाला. वापरापूर्वी नेहमी बाटली व्यवस्थित घुसळा. यामुळे सगळे घटक व्यवस्थित मिक्स होतील. जर, आपल्याला मेकअप रिमूव्हर म्हणून गुलाबाचे पाणी वापरायचे असेल, तर दोन चमचे गुलाबपाण्यात एक चमचा नारळाचे तेल टाका. हे मिश्रण एक उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करेल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Applying rose water on the face is extremely beneficial)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.